वांद्रे येथील न्यायालयात सोमवारी धक्कादायक प्रकार घडला. न्यायालयात एका तरुणाने ब्लेडने स्वत:चा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. तरुण किरकोळ जखमी झाला असून त्याला नजीकच्या रुण्यालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खार पोलिसांनी एका तरुणाला चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती. आरोपीला खटल्याच्या सुनावणीसाठी वांद्रे येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोप सिद्ध झाल्याचे न्यायालयाने निश्चित केल्यानंतर खटल्याची सुनावणी सुरू असतानाच भर न्यायालयात एका तरुणाने ब्लेडने स्वत:चा गाळ कापण्याचा प्रयत्न केला. न्यायालयात उपस्थित असलेल्यांनी त्याला थांबविले आणि त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न केलेला तरुण आरोपीचा भाऊ असल्याचे समजते. तरुणाची प्रकृती ठीक असून पोलीस चौकशी करत आहेत.