नियंत्रणासाठी पालिकेची कीटक नियंत्रण मोहीम

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईत हिवताप (मलेरिया) व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून व जुलै महिन्यात रुग्णसंख्या जास्त आहे. यावर्षी जून व जुलै महिन्यात हिवतापाचे सर्वाधिक ११९४ रुग्ण आढळून आले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी पालिका आयुक्तांच्या मासिक आढावा बैठकीत जुन्या गिरण्या व बंद अवस्थेतील इमारत परिसरात कीटक नियंत्रण करण्यासाठी खासगी कंत्राटदारांची नेमणूक करण्याचा ठराव करण्यात आला.

nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
Rats in operating theaters of V N Desai Hospital
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट
air pollution control system has been in dust since three months
पिंपरी : हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तीन महिन्यांपासून धूळखात
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास

पावसाच्या गैरहजेरीमुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने या पाण्यात डेंग्यू व हिवतापाच्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढतो. जानेवारी ते जुलै या महिन्यात ११९४ हिवतापाचे रुग्ण आढळून आले असून यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर जुलै महिन्यात डेंग्यूचे ७० रुग्ण आढळून आले असून, गेल्या सात महिन्यात २०० डेंग्यूच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. हिवताप व डेंग्यू या आजारांचा प्रसार अनुक्रमे अ‍ॅनोफिलीस व एडिस इजिप्ती या डासांमुळे होतो. या डासांची पैदास साचलेल्या पाण्यात होते. जुलै महिन्यात हिवतापामुळे जोगेश्वरी भागातील २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या शरीरातील प्लेटलेट्स व हिमोग्लोबिन झपाटय़ाने कमी झाले होते.

दूषित पाण्यामुळे मुंबईकर आजारी

दूषित पाण्यामुळे पसरणारे अतिसार, कावीळ व कॉलरा या आजारांचा फैलाव वाढत असून मुंबईकरांनी पदपथावरील पदार्थ खाऊ नयेत व पाणी उकळून प्यावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. जुलै महिन्यात १,०१० अतिसाराच्या रुग्णांची नोंद झाली असून कावीळचे १३४ रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारी ते जुलै या काळात ६३७ काविळीचे रुग्ण आढळले आहेत.

कावीळ झाल्याने गर्भवतीचा मृत्यू

कुल्र्यातील २५ वर्षीय गर्भवती महिलेचा कावीळ या आजाराची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला. ती सात महिन्यांची गर्भवती होती. ती खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. रक्त तपासणीत कावीळ आजाराचे निदान झाल्यानंतर पुढील पाच दिवसात तिचा मृत्यू झाला. कुर्ला परिसरातील फेरीवाल्यांकडील पाण्याची तपासणी केली असता ते पिण्यायोग्य नसल्याचे आढळून आले आहे.

जुलै महिन्यात स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण

फेब्रुवारीमध्ये दोन रुग्णांपासून सुरू झालेला स्वाईन फ्लूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून जुलै महिन्यात ४१३ स्वाईन फ्लू रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. फेब्रुवारी ते जुलै २०१६ मध्ये केवळ ३ स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती मात्र यंदाच्या वर्षी ही संख्या ८३२ पर्यंत पोहोचली आहे. केवळ जुलै महिन्यात ७ तर गेल्या सहा महिन्यात १८ जणांचा मृत्यू झाला आहे.