देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) नाट्यमय घडामोडी संपण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे विशेष संचालक राकेश अस्थाना आणि संचालक आलोक वर्मा यांना सुटीवर पाठवण्यात आले तर इतरांची बदली करण्यात आली आहे. दरम्यान, हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयातही पोहोचले आहे. अस्थाना-वर्मा प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करावी अशा मागणीची याचिका दाखल करण्यात आली आहे.

सीबीआयच्या उच्चपदस्थांमधील हा संघर्ष उफाळला असून बुधवारी या दोन्ही अधिकाऱ्यांना सुटीवर पाठवण्यात आले तर काही अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या. त्याचबरोबर सीबीआयचा पदभार नागश्वेरराव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

त्याचदरम्यान, नितीन देशपांडे यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, इडीचे अधिकार यांचा समावेश असावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.