पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरात घसरण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, गेल्या सुमारे आठवडाभरापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण होत असल्याने लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यानुसार, आज पेट्रोल १५ तर डिझेल १० पैसे प्रतिलिटर स्वस्त झाले आहे.


इंधनाच्या ताज्या किंमतीनुसार, दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ७७.२८ रुपये प्रतिलिटर इतका आहे. यामध्ये ०.१५ पैशांनी तर डिझेल ७२.०९ रुपये प्रतिलिटर अर्थात ०.१० पैशांनी स्वस्त झाले आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल ८२.८० रुपये प्रतिलिटर भाव असून डिझेल ८२.८० रुपये प्रतिलिटर इतके आहे. यामध्ये अनुक्रमे १४ पैसे तर ११ पैशांनी घट झाली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती केंद्र सरकारने मुक्त केल्यानंतर दररोज या इंधनाच्या दरांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे बदल होतात. त्यामुळे आपल्याकडेही दररोज पेट्रोल-डिझेलचे भाव बदलताना पहायला मिळत आहेत.