22 October 2020

News Flash

पेट्रोल, डिझेल महागलं; जाणून घ्या आजचे दर

आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींची नुकतीच बैठक आयोजित केली होती.

आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. बुधवारी फक्त डिझेल महागले होते. मात्र आज पेट्रोल प्रति लिटर ९ पैसे तर डिझेल प्रति लिटर ३० पैशांनी महागले आहे. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८७.९२ रूपये झाली आहे. तर डिझेलची किंमत प्रति लिटर ७८.२२ रूपये झाली आहे. सणासुदीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. नवी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर १० पैशांनी वाढून ८२.३६ रूपयांवर पोहचले आहे. तर डिझेल प्रति लिटर २७ पैशांनी वाढून ७४.६२ रूपयांवर पोहचले आहे.

 

मुंबईसह पालघर, डहाणू, तलासरीमध्ये पेट्रोलचा दर ८७ ते ८८ रुपये आहे, मात्र शेजारच्या गुजरात राज्यात पेट्रोलचा दर ८० रुपये असल्याने सीमाभागातील अनेक वाहनचालक इंधन भरण्यासाठी गुजरातकडे जात असल्याचे चित्र आहे. गुजरातकडे जाणारा वाहनचालकही महाराष्ट्रात पेट्रोल भरण्यापेक्षा गुजरामध्ये पेट्रोल भरणे अधिक पसंद करत आहे. गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील डिजेल दर स्वस्त असल्याने डिजेलवर चालणाऱ्या वाहनांचे चालक मात्र महाराष्ट्रात डिजेल भरत आहेत.

महाराष्ट्राच्या सीमेलगत असणाऱ्या चारोटी येथे डिझेलचा दर ७६.४४ रुपये आहे, तर गुजरातमध्ये वापी येथे डिझेलचा दर ७८.०६ प्रतिलिटर आहे. डिझेलचे दर राज्यात कमी असल्याने अवजड वाहेन तसेच डिझेलवर चालणारी वाहने वसई आणि पालघर तालुक्यात इंधन भरताना दिसून येत आहेत. महाराष्ट्रात डिझेल गुजरातपेक्षा स्वस्त मिळते म्हणून आम्ही डिझेलसाठी महाराष्ट्रातील पंपावर जातो, असे गुजरातमधून महाराष्ट्रात येणाऱ्या ट्रकचालकांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 7:47 am

Web Title: petrol and diesel per litre prices increase
Next Stories
1 #MeToo : नाना पाटेकरांसह चार जणांवर गुन्हा दाखल
2 आंध्र, ओडिशाला ‘तितली’ची धडक; शाळा-कॉलेज बंद, 3 लाख नागरिकांना हलवले
3 मूळ कागदपत्रांशिवाय प्रवेशअर्ज करण्यास मुभा
Just Now!
X