30 October 2020

News Flash

ठाणे, नवी मुंबईत पेट्रोल व डिझेल स्वस्त

ठाणे तसेच नवी मुंबई शहरातील इंधनावरील स्थानिक संस्था कर दिड टक्क्य़ांनी कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांतील पेट्रोल सुमारे

| July 13, 2013 04:52 am

ठाणे तसेच नवी मुंबई शहरातील इंधनावरील स्थानिक संस्था कर दिड टक्क्य़ांनी कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांतील पेट्रोल सुमारे पावणे दोन रुपयांनी तर डिझेल सव्वा रुपयांनी स्वस्त होणार आहे.
या निर्णयाची उद्या, शनिवारपासूनच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नव्या दरसूचीनुसार, ठाणे शहरात लीटरमागे पेट्रोलचा दर सुमारे ७६ रूपये तर डिझेलचा दर ५८ रुपये, असा असणार आहे. नवी मुंबईतही अनुक्रमे ७६ आणि ६० रुपये इतका होण्याची शक्यता आहे.
ठाणे शहरात इंधनावर साडे चार टक्के जकात कर होता, त्यामुळे ठाणेकरांना मुंबई तसेच नवी मुंबईच्या तुलनेत पेट्रोल, डिझेल या इंधनासाठी जादा पैसे मोजावे लागत होते. गेल्यावर्षी इंधनावरील जकात दर कमी करण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे महापालिकेने पाठविला होता. त्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर सर्वसाधारण सभेत जकात दर कमी करून तो ०.५ इतका करण्यात आला होता. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईच्या तुलनेत ठाणे शहरात इंधनाचे दर कमी झाले होते. मात्र, यंदाच्या एप्रिल महिन्यापासून ठाणे महापालिकेने जकात कर बंद करून त्याऐवजी स्थानिक संस्था कर लागू केला. त्यामध्ये इंधनावरील स्थानिक संस्था कर साडे तीन टक्के इतका आहे. त्यामुळे ठाणे शहरातील पेट्रोल व डिझेल, आदी इंधनाचे दर पुन्हा वाढले. अशीच अवस्था नवी मुंबईतही आहे.
दरम्यान, ठाणे आणि नवी मुंबई या महापालिकेच्या आयुक्तांनी इंधनावरील स्थानिक संस्था कर कमी करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होते. त्यानुसार, या दोन्ही शहरातील इंधनावरील स्थानिक संस्था कर साडेतीन टक्क्य़ांऐवजी दोन टक्के करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
सध्याचे इंधनाचे दर
               ठाणे शहर      नवी मुंबई
पेट्रोल –      ७८.०६          ७७.७७
डिझेल –     ५९.९०           ६२.५०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 4:52 am

Web Title: petrol and diesel price comes down in thane and new mumbai
टॅग Diesel,Petrol,Price
Next Stories
1 यशस्वी विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार
2 मुलीची हत्या करून मातेची आत्महत्या
3 आरक्षणप्रश्नी संघर्ष टाळण्यासाठी आता.. ‘मराठा – ओबीसी समन्वय समिती’
Just Now!
X