News Flash

पेट्रोल ८०, तर डिझेल ६७ रुपयांवर

गेल्या ५० दिवसांमध्ये पेट्रोलची सातत्याने दरवाढ झाली असून या काळात पेट्रोल १२.३९ रुपयांनी महागले.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका उडाला आहे. सोमवारी पेट्रोलने ८० रुपयांचा पल्ला पार केला असून डिझेलचे दरही ६७.१० रुपयांवर पोहोचले. गेल्या ५० दिवसांमध्ये पेट्रोलची सातत्याने दरवाढ झाली असून या काळात पेट्रोल १२.३९ रुपयांनी महागले. १ डिसेंबर २०१७ पासून सोमवापर्यंत दर दिवशी पेट्रोलच्या किमती काही पैशांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, डिझेलची ही गेल्या चार वर्षांमधील दुसरी उच्चतम किंमत असल्याचे वाहतूक क्षेत्रातून सांगण्यात आले.

ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्टच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष बाल मल्कीत सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने तेल किमतीचे दर निश्चित करण्याचे अधिकार उत्पादक कंपन्यांना दिले आहेत. रोजच्या रोज वाढणाऱ्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याची कोणतीही व्यवस्था सरकारकडे सद्यस्थितीत अस्तित्वात नाही. केंद्राचा अबकारी कर आणि विविध राज्यांकडून आकारण्यात येणाऱ्या व्हॅटमुळे या किमती वाढत आहेत.

संघटनेच्या वतीने रोजच्या रोज दरवाढ करण्याऐवजी तीन महिन्यांनी दरांमध्ये फरक करावा, पेट्रोल आणि डिझेलाही वस्तू सेवा कराच्या कार्यकक्षेत घ्यावे आणि सध्या केलेली दरवाढ विशेषत: डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशा प्रमुख मागण्या केंद्र सरकारकडे करण्यात आल्या आहेत. या दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसू शकतो, असा दावाही मालवाहतूकदारांकडून केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 4:21 am

Web Title: petrol diesel price hike 3
Next Stories
1 धन्य आमुची सयाजी नगरी, धन्य आमुची बडोदे नगरी..
2 राज्याचा ‘सनदी’कोटा वाढला
3 स्थानिकांशी सुसंवादासाठी कन्नडमध्ये बोललो!
Just Now!
X