दसऱ्याच्या दिवशी थोडीसी आनंददायक बातमी आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोल प्रति लिटर २१ पैशांनी स्वस्त झाले आहे तर डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर ११ पैशांनी कपात झाली आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोल प्रति लिटर ८८.०८ रुपये मिळेल तर डिझेल प्रति लिटर ७९. २४ रूपये असणार आहे.