पेट्रोलच्या दरात आज शनिवारी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ११ पैशांनी महागले आहे. पेट्रोल आता प्रति लिटर ८९.८० रूपये झाले आहे. पेट्रोलच्या दरात जरी वाढ झाली असली तरी डिझेल दर मात्र स्थिर आहेत.
राजधानी नवी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर ८२.४४ रूपये झाले आहे तर डिझेलची किंमत प्रति लिटर ७३.८७ रूपये झाली आहे. काल शुक्रवारी पेट्रोल प्रति लिटर १५ पैशांनी वाढले होते. डिझेलचे दर दोन-तीन दिवसांपूर्वी जे होते तेच आजही आहेत डिझेलचा प्रति लिटर दर हा आजही ७८ रुपये ४२ पैसे इतकाच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून डिझेलचे दर वाढलेले नसले तरी त्याआधी मात्र, दोन आठवड्यात डिझेलच्या दरात जवळपास दीड रुपयांची वाढ झाली आहे.

मुंबईत मंगळवारी पेट्रोल १० पैशांनी तर डिझेल ९ पैशांनी महागले होते. मुंबईत मंगळवारी पेट्रोलचा प्रति लिटर दर ८९ रुपये ५४ पैसे तर डिझेलचा प्रति लिटर दर ७८ रुपये ४२ पैसे इतका होता. प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol diesel prices in mumbai are rs 89 80 per litre rs 78 42 per litre respectively
First published on: 22-09-2018 at 07:35 IST