रॉयटर्स या वृत्तसंस्थेचे फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीक्की यांना त्यांच्या रोहिंग्या रेफ्युजीच्या फोटोसाठी सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. म्यानमारमधून बांगलादेशमध्ये जाणाऱ्या रोहिंग्या विस्थापितांचे फोटो दानिश सिद्दीक्की यांनी काढले आहेत. यापैकी एका फोटोत एक रोहिंग्या माणूस आपल्या मुलाला खेचून घेऊन चालला आहे अशा आशयाचा एक फोटो आहे. दानिश सिद्दीक्की यांनी काढलेल्या या फोटोला सर्वाधिक पसंती लाभली आहे. दानिश सिद्दीक्की यांचे सहकारी अदनान अबिदी यांनाही पुलित्झर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

मुंबई प्रेस क्लबनेही एक प्रेस नोट काढून फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीक्की यांचे अभिनंदन केले आहे.

 

पत्रकारितेतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची सुरुवात १९१७ मध्ये झाली. पुरस्कार विजेत्यांना १५ हजार अमेरिकी डॉलर्स आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते. पत्रकारिता, साहित्य. संगीत रचना, वृत्तपत्रासाठीची पत्रकारिता, फोटोग्राफी या सर्वांसाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. मुंबईचे फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीक्की यांना हा यावर्षी हा पुरस्कार जिंकण्याचा बहुमान मिळाला आहे. ही बाब मुंबईसाठी आणि संपूर्ण देशासाठीच अभिमानाची आहे यात काहीही शंका नाही.