ठाणे पोलीस आयुक्तपदी अनुक्रमे राकेश मारिया आणि विजय कांबळे यांच्या झालेल्या नियुक्तीला गुरूवारी जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले.
या दोघांची आयुक्तपदी करण्यात आलेली नियुक्ती आणि जावेद अहमद यांना देण्यात आलेली बढती ही नियम धाब्यावर बसवून करण्यात आल्याचा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला आहे.
हेमंत पाटील यांनी ही याचिका केली असून मारिया, कांबळे आणि जावेद यांच्या नव्या पदाबाबत घेतलेल्या बैठकीबाबतचा, त्यांची नियुक्ती करण्याबाबत केलेल्या शिफारशींचा तपशील सादर करण्याचे आदेश राज्य सरकार आणि गृसचिवांना देण्याची मागणी केली आहे. तसेच याचिका निकाली निघेपर्यंत मारिया आणि कांबळे यांच्या आयुक्तपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली आहे.
मारिया यांच्यासह कांबळे आणि जावेद यांचेही मुंबईच्या आयुक्तपदाच्या शर्यतीमध्ये नाव होते. परंतु मारिया यांची मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती करून त्यांच्यापेक्षा सेवेत वरिष्ठ असलेल्या कांबळे आणि जावेद या दोघांवर उघडपणे अन्याय करण्यात
आला.
या दोन्ही अधिकाऱ्यांनी नंतर नवा पदभार सांभाळायला नकार दिला. त्याचा जनहितावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचाही याचिकेत दावा करण्यात आला आहे.