घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवर पिलर कोसळला असल्याची माहिती मिळत आहे.  काम सुरु असताना हा पिलर कोसळला आहे. सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र वाहतूक विस्कळीत झाली आहे. एका चारचाकी आणि बीट मार्शल दुचाकीवर हा पिलर कोसळला आहे. सध्या पिलर हटवण्याचं काम सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ट्रकने या लोखंडी पिलरला धडक दिली. यामुळे पिलर हलला होता. पिलर हा खाली उभ्या असलेल्या एका चारचाकी आणि दुचाकीवर पडला. ही दुचाकी पोलिसांची आहे. आधीच सुरु असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असताना पिलर कोसळल्याने त्यात भर पडली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.