उद्या अंत्यसंस्कार
मुंबई : केरळमधील कोळिकोड विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले कॅप्टन दीपक साठे यांचे पार्थिव रविवारी दुपारी मुंबईत आणण्यात आले. साठे यांच्यावर ११ ऑगस्टला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शुक्र वारी दुबईहून आलेले एयर इंडियाचे विमान कोळिकोड येथील आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरले आणि झालेल्या अपघातात कॅ प्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला. यामध्ये काही प्रवासीही मृत्युमुखी पडले. या अपघाताची चौकशीही के ली जात आहे. अपघातानंतर दीपक साठे यांचे पार्थिव ताब्यात घेण्यासाठी यांची पत्नी, मुलगा, बहीण आणि मेहुणे केरळ येथे रवाना झाले होते. विमानाद्वारे रविवारी दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. रविवारी दुपारी साठे यांचे पार्थिव काही काळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या एयर इंडियाच्या विभागात ठेवण्यात आले होते. यावेळेस वैमानिक आणि एयर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी साठे यांना श्रद्धांजली वाहिली. साठे यांचा मोठा मुलगा शंतनू अमेरिकेतून सोमवारी सायंकाळी मुंबईला पोहोचणार आहे. त्यानंतर, मुंबईतील पवई येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 10, 2020 3:45 am