19 September 2020

News Flash

पिझ्झा डिलिव्हरी बॉयकडून बलात्काराचा प्रयत्न

पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या डिलिव्हरी बॉयने एका तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करून तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर नायर रुग्णालयात उपचार

| June 27, 2013 03:52 am

पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या डिलिव्हरी बॉयने एका तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करून तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर नायर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, हा डिलिव्हरी बॉय अल्पवयीन असून त्याला अटकेनंतर बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
वरळीत राहणाऱ्या २२ वर्षांच्या या तरुणीने जवळच्याच एका दुकानात पिझ्झाची ऑर्डर दिली होती. मंगळवारी संध्याकाळी ८ च्या सुमारास पिझ्झा घेऊन १७ वर्षीय डिलिव्हरी बॉय तिच्या घरी गेला. घरात ती एकटीच असल्याचे त्याने पाहिले. दहा मिनिटांनी तो पुन्हा घरी आला. चुकीची ऑर्डर दिली आहे, असे सांगून तो घरात घुसला आणि त्याने तरुणीला दुकानात फोन करायला सांगितले. ती बेसावध असताना त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने प्रतिकार करताच त्याने किचनमधील चाकूने तिच्यावर वार केले. तिच्या मानेवर, पोटावर, हातावर आणि छातीवर वार केले. बचावासाठी तरुणी ओरडू लागल्यानंतर हा मुलगा या तरुणीचा मोबाइल घेऊन पळून गेला. तरुणीचा आवाज ऐकून मदतीसाठी आलेल्या शेजाऱ्यांनी दुसऱ्या चावीने दार उघडून तिला पोद्दार रुग्णालयात नेले. नंतर तिला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपी डिलिव्हरी बॉयला पहाटे चारच्या सुमारास अटक केली. दरम्यान, आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त विनायक देशमुख यांनी सांगितले. त्याच्यावर बलात्कार आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वरळी परिसरातच राहणारा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 3:52 am

Web Title: pizza delivery boy arrested for allegedly attempting to rape customer
Next Stories
1 भाजीबाजारात वाटमारी!
2 मुंबईत आज ठणठणाट
3 नवीन प्रशासकीय इमारत धोक्याच्या उंबरठय़ावर
Just Now!
X