News Flash

शीळ येथे दरोडय़ाचा डाव उधळला

पेट्रोल पंपावर दरोडा घालण्यासाठी येणाऱ्या टोळीची माहिती मिळाल्याने सापळा रचून ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने चार जणांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार मात्र पळून

| May 22, 2014 04:18 am

पेट्रोल पंपावर दरोडा घालण्यासाठी येणाऱ्या टोळीची माहिती मिळाल्याने सापळा रचून ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने चार जणांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार मात्र पळून गेला. सतीश कोळी (५३) वांगणी, अलेक्झांडर तेवेंद्रा (३०) वांगणी, गिरीष नायर (२९) कळवा, भरत बिंदर (३०) कळवा अशी अटक आरोपींचे नावे असून त्यांच्यावर चोरी, घरफोडी, दरोडय़ांची गुन्हे दाखल आहेत.
शिळ डायघर येथील शुभम बार अ‍ॅण्ड रेस्टॉरेंट समोरील एका पेट्रोल पंपावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार एका पोलीसांनी या भागात सापळा रचला होता. संशयीत पाच आरोपी पेट्रोलपंपाच्या दिशेने निघाले असता पोलीसांनी त्यांना पकडण्यासाठी हालचाल केली. त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातील चौघांना पोलीसांनी अटक केली. तर त्यांचा एक साथीदार मात्र तेथून पसार झाला. अटक आरोपींकडून देशी बनावटीचा कट्टा, दोन चॉपर, मिरची पुड, रस्सी व एक टॉय गन  हस्तगत केली.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र डोईफोडे यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 4:18 am

Web Title: plan of robbery at shil detained
Next Stories
1 उल्हासनगर महापालिकेच्या पाच माजी उपायुक्तांविरोधात गुन्हा
2 भाजपला जास्त जागा हव्यातच
3 अखेर त्या लहानग्याची सुटका…
Just Now!
X