News Flash

संभाव्य लाटेत उद्योग सुरू ठेवण्याचे नियोजन करावे- मुख्यमंत्री 

तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरू  राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करून  परिपूर्ण आराखडा तयार करावा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरू  राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करून  परिपूर्ण आराखडा तयार करावा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.  मोठ्या कंपन्यांनी  कामगारांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था उद्योगाच्या आवारात करावी व ज्यांना हे  शक्य नाही, त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी  परिसरात ही व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करावे, कामगारांच्या वाहतुकीतही मदत करावी, असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 1:17 am

Web Title: planning to continue the industry in potential waves chief minister uddhav thackeray akp 94
Next Stories
1 अनिल देशमुख यांची चार कोटींची संपत्ती जप्त
2 जेटच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेत कर्मचाऱ्यांचा असहकार
3 पावसाचा धुमाकूळ
Just Now!
X