17 January 2021

News Flash

Plastic Ban in Maharashtra: प्लास्टिक बंदीबाबतची सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Plastic Ban in Maharashtra:नियमभंग केल्यास पहिल्या वेळी पाच हजार रुपये आणि दुसऱ्या वेळी १० हजार रुपये दंडाची तरतूद. तिसऱ्या वेळी पकडले गेल्यास २५ हजार रुपये

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

Plastic Ban in Maharashtra: शनिवारपासून राज्यात प्लास्टिकबंदी लागू होत असून यासाठी महापालिकाही सज्ज झाल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने २३ मार्च रोजी अधिसूचना काढत लागू केलेली सरसकट प्लास्टिकबंदी तीन महिन्यांनंतर आजपासून लागू होत आहे. प्लास्टिकला पर्याय असलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे २४ जूनपर्यंत काळात सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत भरवण्यात आले आहे. प्लास्टिकबंदीमध्ये नेमकी कशावर बंदी असेल, प्लास्टिकबंदीचे उल्लंघन केल्यास दंड किती याचा घेतलेला हा आढावा…

बंदी कशावर?
* प्लास्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या. पातळ-जाड, बंध असलेल्या-नसलेल्या सर्व पिशव्या.
* थर्माकोल व प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या व एकदाच वापरून फेकल्या जाणाऱ्या वस्तू. उदा. ताट, वाटय़ा, ग्लास, चमचे इ.
* उपाहारगृहात अन्न देण्यासाठी वापरले जाणारे डबे, स्ट्रॉ, नॉनवोवन पॉलिप्रॉपिलेन बॅग. (वोवन पॉलिप्रॉपिलेन बॅग या धान्य साठवण्यासाठी वापरल्या जातात.)
* नारळपाणी, चहा, सूप इ. पातळ पदार्थ देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्या.
* थर्माकोल व प्लास्टिकचे सजावट साहित्य

बंदी कशावर नाही?
* उत्पादकांकडूनच प्लास्टिकच्या वेष्टनात येणारे पदार्थ. उदा. ब्रॅण्डेड वेफर्स, चिवडा इ.
* ब्रॅण्डेड शर्ट, ड्रेस, साडय़ा यांची उत्पादकांकडून गुंडाळलेली प्लास्टिक वेष्टने
* ब्रॅण्डेड दूध, तेल असलेल्या जाड प्लास्टिक पिशव्या तसेच बाटलीबंद पाणी.
* शेती, रोपवाटिका, ओला कचरा जमा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विघटनशील प्लास्टिकच्या पिशव्या.
* निर्यात होणाऱ्या वस्तूंच्या वेष्टनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक
* औषधांसाठी वापरले जाणारे वेष्टन.

कारवाई कुठे?
सर्व दुकाने, कंपन्या, सार्वजनिक ठिकाणे, वने, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र, शासकीय, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, चित्रपटगृह व नाट्यगृह

कारवाई कोणावर?
राज्यातील कोणतीही व्यक्ती व व्यक्तींचा समूह, दुकानदार, मॉल्स, फेरीवाले, वितरक, वाहतूकदार, मंडई, कॅटरर्स.

दंड : महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण अधिनियम
२००६ नुसार नियमभंग केल्यास पहिल्या वेळी पाच हजार रुपये आणि दुसऱ्या वेळी १० हजार रुपये दंडाची तरतूद. तिसऱ्या वेळी पकडले गेल्यास २५ हजार रुपये व तीन महिन्यांची कैदेची तरतूद.

हेल्पलाईनवर साधा संपर्क
> प्लास्टिकबंदीबाबत सविस्तर माहितीसाठी मुंबईतील नागरिकांना १८००२२२३५७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.

मुंबईकरांनो, या ठिकाणी जमा करता येणार तुमच्याकडील प्लास्टिक

> नवी मुंबईतील नागरिकांसाठी हेल्पलाईन
बेलापूर १८००२२२३१२
नेरुळ १८००२२२३१३
वाशी १८०२२२३१५
तुर्भे १८००२२२३१४
कोपरखैरणे १८००२२२३१६
घणसोली १८००२२२३१७
ऐरोली १८००२२३१८
दिघा १८००२२२३१९
महापालिका मुख्यालय १८००२२२३०९, १८००२२२३१०

> पनवेल महापालिका हेल्पलाईन
पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी प्लास्टिक संकलनासंदर्भात १८००२२७७०१ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ९७६९ ०१२ ०१२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

> ठाणे महापालिका हेल्पलाईन
ठाणे महापालिकेतर्फे प्लास्टिक आणि थर्माकुल मुक्त ठाणे ही मोहीम राबवण्यात येत असून गावदेवी, नौपाडा, जांभळी नाका या परिसरात प्लास्टिक आणि थर्माकोल संकलनासाठी वाहने तैनात करण्यात येणार आहे. घर आणि मॉलमधील प्लास्टिक संकलनासाठी ८२९१ ७३ ५८ ९३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

> वसई – विरारसाठी संकलन केंद्र
वसई विरार महापालिकेच्या नऊ प्रभागातील प्रभाग समिती कार्यालयात प्लास्टिक संकलन केंद्रे तयार केली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 8:16 am

Web Title: plastic ban in maharashtra all you need know helpline mumbai thane mumbai navi mumbai fine
Next Stories
1 …मग तर उर्जित पटेल यांच्यावरच खटला चालवायला हवा: शिवसेना
2 पवार यांच्यासमवेत मैत्रीचे गुपित उपराष्ट्रपतींनी उलगडले
3 हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी न्यायाधीश पतीविरोधात गुन्हा
Just Now!
X