07 March 2021

News Flash

प्लास्टिक पिशव्या, थर्माकोलच्या वस्तूंवर गुढीपाडव्यापासून बंदी

बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना २५ हजारांचा दंड

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

राज्यात रविवारी गुढीपाडव्यापासून प्लास्टिक पिशव्या, थर्माकोलच्या ताट, वाटय़ा, चमचे, पेले,  कप याबरोबरच जाहिरातींचे फ्लेक्स, बॅनर्स, तोरण यांच्या निर्मिती आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाल्याचे समजते. शुक्रवारी विधानसभेत त्याची घोषणा अपेक्षित आहे.

या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना २५ हजारांचा दंड आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. प्लास्टिक बाटल्यांचा मात्र या बंदीत समावेश झालेला नाही. तसेच दुधासारख्या पदार्थाच्या प्लास्टिक पिशव्यांचा या बंदीत समावेश नसल्याचे समजते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 2:13 am

Web Title: plastic ban in maharashtra from marathi new year
Next Stories
1 ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाबाबत आठवडाभरात निर्णय’
2 अपंगांच्या डब्यातील ‘घुसखोरां’ना आता एक लाख रुपये दंड!
3 अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दिमतीला ३० नव्या इनोव्हा
Just Now!
X