16 January 2021

News Flash

Plastic ban in Mumbai: मुंबईकरांनो, या ठिकाणी जमा करता येणार तुमच्याकडील प्लास्टिक

Plastic ban in Mumbai: १० किलोपेक्षा जास्त प्लास्टिक जमा असल्यास महापालिका वाहन पाठवून प्लास्टिक संकलित करेल. मुंबई महापालिकेच्या सर्व मंडईंमध्ये प्लास्टिक जमा करता येणार

Plastic ban in Mumbai: प्लास्टिकचे शहरातून समूळ उच्चाटन करण्यासाठी महापालिकांनी प्लास्टिक संकलन केंद्र सुरु केले आहेत.

Plastic ban in Mumbai: मुंबई हायकोर्टाने दिलेल्या मुदतवाढीनंतर आजपासून (शनिवारी, २३ जूनपासून) राज्यभरात प्लास्टिकबंदी लागू होणार आहे. प्लास्टिकचे शहरातून समूळ उच्चाटन करण्यासाठी महापालिकांनी प्लास्टिक संकलन केंद्र सुरु केले असून या केंद्रांत प्लास्टिक जमा करता येणार आहे. मुंबई महापालिकेने प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीची तयारी केली आहे.  १० किलोपेक्षा जास्त प्लास्टिक जमा असल्यास महापालिका वाहन पाठवून प्लास्टिक संकलित करेल. मुंबई महापालिकेच्या सर्व मंडईंमध्ये प्लास्टिक जमा करता येणार असून याशिवाय महापालिकेने विविध ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्रदेखील सुरु केले आहे.

मुंबईतील प्लास्टिक संकलन केंद्रांची यादी

 •  सुरक्षा गार्डन, कफ परेड, कुलाबा
 • टाटा पॉवर सेंटर समोर, संत तुकाराम रोड, मुंबईचं शेवटचं टोक.
 • नंदलाल जानी रोड, एस. व्ही रोड, खालची बाजू
 • कुंभारवाडा, नॉर्थ बुक, ज्युईश कबरस्तान, एम. एस. अली रोड, दुर्गादेवी उद्यानाजवळ
 • बॉम्बे गॅरेज, बाबुलनाथ
 • घास गल्ली, सानेगुरुजी मार्ग, आग्रीपाडा
 • दीनशा पेटीट लेन, लालबा
 • कॉटनग्रीन रेल्वेस्टेशन तिकीट काऊंटर खाली, कॉटन ग्रीन
 • टी. बी. हॉस्पिटलजवळ, जेरबाई वाडिया मार्ग
 • आर. जी. प्लॉट, सी- १७, बस डेपो मार्ग, शेख मिस्त्री दर्गा, अँटॉप हिल
 • फायर ब्रिगेडजवळ
 • एल. जी. पी यार्ड, इंजिनियरिंग हब प्रिमायसेसजवळ, डॉ. ई. मोझेस रोड, वरळी
 • धारावी पंपिंग, धारावी
 • प्रमोद महाजन गार्डन, दादर
 • कचराकुंडी नंबर – २, भारतनगरच्या कोपऱ्याजवळ, बीकेसी
 • वांद्रे एम. टी. एन. एल टेलिफोन एक्स्चेंजजवळ, वांद्रे (पश्चिम)
 • टी. पी. एस रोड क्रमांक ३, धर्मवीर संभाजी ग्राऊंड, कोटवाडी, सांताक्रूझ (प)
 • चेकपोस्ट चौकीजवळ, महाकाली रोड, फुटपाथ
 • कपासवाडी, वर्सोवा लिंक रोड, अंधेरी (प.)
 • अजित ग्लास, जोगेश्वरी (प.)
 • यशराज, वीरा देसाई रोड
 • इको हाऊसजवळ, विश्वेश्वर क्रॉस रोड, गोरेगाव (पूर्व)
 • एस. व्ही. रोडचे रेलिगेअर, महेश नगरसमोर, गोरेगाव (प.)
 • मार्वे पंपिंग स्टेशनजवळ, मार्वे रोड, मालाड (प.)
 • मेंटेनन्स चौकीजवळ, साईनगर, कांदिवली फूटपाथ
 • एमएल चौकीजवळ, कांदिवाली (पूर्व)
 • पिंपळ गल्ली, हिंदुस्तान नाकाजवळ, कांदिवली
 • एम.सी.जी. एम प्लॉट, शिंपोली टेलिफोन एक्स्चेंज समोर, शिंपोली, बोरिवली (प.)
 • ११, जे. के कंपाऊंड, आहिल्य हैद मशीदजवळ, खैराणी रोड, साकीनाका, कुर्ला (प.)
 • शताब्दी रुग्णालयातील बायोगॅस प्रकल्पाजवळ
 • सिंधी सोसायटीचे हेलिपॅड, काला रोडचा शेवटचा भाग, चेंबूर शेड १
 • सिंधी सोसायटीचे हेलिपॅड, काला रोडचा शेवटचा भाग, चेंबूर शेड २
 • एमसीजीएम अॅनिमिटी प्लॉट, सिकोचा कंपाऊंडजवळ, घाटकोपर (प.)
 • लेक रोड, हिंद रेक्टीफायर, भांडूप
 • फ्लाय ओव्हर ब्रीज खाली, व्ही. बी. फडके रोड, मुलुंड (प)
 • नंदनवन औद्योगिक परिसर, मालवीय रोडच्या विरुद्ध बाजूला, मुलुंड (प)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 3:27 am

Web Title: plastic ban in maharashtra mumbai bmc dump your plastic trash at these collection centres
Next Stories
1 प्रभारी म्हणून मोहन प्रकाश यांची प्रदीर्घ कारकीर्द
2 ‘पाण्याचा दर्जा आणि गळती ही शहरांची समस्या’
3 ‘नद्यांवरही उद्योजकांचा ताबा’
Just Now!
X