करोनाच्या साथीमुळे देशभरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा फायदा उठवत एकाचवेळी शेतकरी आणि ग्राहकांची फसवणूक करण्याचा नवा उद्योग काही व्यापाऱ्यांनी सुरू के ला आहे.

जळगावमध्ये पाच रुपये डझन दराने खरेदी के लेली के ळी मुंबई- पुण्यात मात्र पन्नास रूपयांपेक्षा अधिक दराने विकली जात असून व्यापाऱ्यांकडून होणार ही लूटमार थांबविण्यासाठी सरकारने वेळीच हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.

करोनामुळे राज्यातील सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. टाळेबंदीचा लोकांना अधिक त्रास होऊ नये यासाठी जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला. कडधान्य यांची दुकाने तसेच वाहतूकीस सरकारने परवानगी दिली आहे.  व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक दूर करण्यासाठी सरकारने काही वर्षांपूर्वी फळे- भाजीपाला नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता याचाच फायदा उठवत शेतकऱ्यांची अडवणूक आणि ग्राहकांची लुबाडणूक करण्यास व्यापाऱ्यांनी सुरूवात के ली आहे. याचा सर्वाधिक फटका  फळ उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. करोनाचा बाऊ करीत के ळी आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची पसवणूक केलीजात आहे.

बाजार समितीमध्ये व्यापारी आणि शेतकरी यांच्यात झालेल्या समझोत्यानुसार किमान बाराशे रूपये क्विंटल दराने केळी खरेदी करण्याचा निर्णय झालेला असतानाही प्रत्यक्षात मात्र व्यापारी ही के ळी साडेतीनशे ते पाचशे रुपये क्विं टल दराने खरेदी करीत आहेत. म्हणजेच पाच रूपये डझनने खरेदी के लेली ही केळी नाशिकमध्ये ग्राहकांना ४० रुपये तर मुंबई- पुण्यात ६० ते ७० रुपये प्रति डझनने मिळत आहेत.

अशाच प्रकारे १०ते १२ रुपये किलोने शेतकऱ्यांकडून द्राक्षांची खरेदी के ली  जात असून लोकांना मात्र ती १०० ते १२५ रुपये किलोने विकली  जात आहेत. अशीच परिस्थिती भाजीपाला व अन्य फळाच्या बाबतीत असून लाखो रूपये खर्चून तसेच मेहनत करून पिकविलेल्या के ळी, द्राक्षाच्या बागा मातीमोल होण्याच्या परिस्थितीने शेतकरी हवालदील झाल आहे. त्यामुळे दररोज १० लाख लिटर दुधाची खरेदी करून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरकारने जसा दिलासा दिला आहे. तसाच दिलासा फळ बागायतदार शेतकऱ्यांनाही द्यावा, अशी मागणी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान  सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा उठविण्यास व्यापाऱ्यांनी सुरूवात के ली असून सरकारने शेतकऱ्यांचा माल खरेदी करावा किं वा जळगाव,नाशिक, वाशी, पुणे या बाजार समित्यांमध्ये दुवा म्हणून काम करून व्यापाऱ्यांची मक्ते दारी मोडून काढण्याची गरज असल्याचेही नवले यांनी सांगितले.

आणखी काही दिवसांत सुधारणेचा सरकारचा दावा

देशभरातील टाळेबंदीमुळे के ळी तसेच द्राक्षाला सध्या मागणी नसल्याने निर्माण झालेली कोंडी येत्या काही दिवसांत फु टेल. तसेच शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील खरेदी-विक्रीची साखळी अधिक मजबूत करण्यावर सरकारने भर दिला असून त्याचे चांगले परिणाम येत्या काही दिवसात दिसतील, अशी माहिती पणन विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

करोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच ७५ टक्के  द्राक्षांची निर्यात झाली होती. आताही विदेशातून द्राक्षाला मागणी आहे, मात्र बंदमुळे निर्यातीत अडचणी निर्माण झाल्यात. कारखाने बंद असल्याने द्राक्षांसाठी पेट्य़ा उपलब्ध करण्यात अडचणी येत होत्या. मात्र मुंबईत आता मदत कक्ष सुरू करण्यात आला असून येत्या दोन दिवसात द्राक्षाची निर्यात पुन्हा सुरू होईल. तसेच के ळीला सर्वाधिक मागणी उत्तर भारताततून असते. मात्र टाळेबंदीमुळे ही मागणी कमी झाल्याने निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्याचा सरकार प्रयत्न करीत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.