06 March 2021

News Flash

पनवेल : मुलीला विष देऊन प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून तरुणीसह तिचा प्रियकर अत्यवस्थ

(सांकेतिक छायाचित्र)

केरळमध्ये पतीची हत्या करून प्रियकर आणि मुलीसह पनवेल येथे पळून आलेल्या तरुणीने मुलीला विष देऊन प्रियकरासह आत्महत्येचा प्रयत्न केला. यात दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून तरुणीसह तिचा प्रियकर अत्यवस्थ आहे. पनवेल मार्केट यार्ड येथील समीर लॉजमध्ये शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.

केरळमधील संतापूर गावात रिजोश व लिजी कुरीयन हे दाम्पत्य आपल्या दोन वर्षीय मुलीसोबत राहत होते. लिजी नोकरी करत असलेल्या दुकानातच काम करत असलेल्या वासीम अब्दुल कादिरबरोबर तिचे अनैतिक संबंध होते. त्यासंबंधातून रिजोशची हत्या करून लिजी-वासीम संतापूर पोलिसांचा ससेमीरा चुकविण्यासाठी मुलीसह ५ नोव्हेंबरला मुंबईला पळून आले होते. ते फरार असल्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती.

संतापूर पोलिसांनी वासीमच्या भावाला रिजोशच्या खूनप्रकरणी ताब्यात घेतल्याची माहिती लिजीला मिळाली. त्यामुळे या दोघांनी मुलीसह विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दुपार झाली तरी वासीम दरवाजा उघडत नसल्याने लॉजचालकाने दरवाजा उघडला असता तिघेही बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना पनवेल येथील नाना धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. अत्यवस्थ लिजी-वासीमला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2019 1:27 pm

Web Title: poison couple panvel market yard nck 90
Next Stories
1 ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे महाराष्ट्राची गरज’
2 काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता
3 अभिजीत बिचुकले करणार सत्ता स्थापनेचा दावा
Just Now!
X