26 November 2020

News Flash

पोलिसांची खाती एचडीएफसी बँकेत

एचडीएफसी बँकेने जास्त सुविधा उपलब्ध केल्याने निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई पोलीस दलातील ४५ हजारांहून अधिक अधिकारी, अंमलदारांचे वेतन खाते एचडीएफसी बँकेत सुरू करण्याचा निर्णय बुधवारी पोलीस आयुक्तांनी घेतला. याआधी पोलिसांचे वेतन खाते अ‍ॅक्सिस बँकेत होते. अ‍ॅक्सिस बँके सोबतचा सामंजस्य करार संपुष्टात आल्यानंतर विविध बँकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यापैकी एचडीएफसी बँकेने जास्त सुविधा उपलब्ध केल्याने हा निर्णय घेतल्याचे आयुक्त परमबीर सिंग यांनी स्पष्ट केले.

मुंबई पोलीस दलात सुमारे चार हजार अधिकारी तर ४२ हजार अंमलदार आहेत. २००३मध्ये मुंबई पोलीस दलासह मंत्रालयीन कर्मचाऱ्यांची वेतन खाती अ‍ॅक्सिस बँकेत सुरू करण्यात आली. २०१५मध्ये बॅँके सोबत सामंजस्य करार करण्यात आला. त्यान्वये वेतन खात्यांची मुदत २०२०पर्यंत वाढवण्यात आली होती.

करोना संसर्गाने मृत्यू झाल्यास १० लाखांचे, अपघाती मृत्यू झाल्यास एक कोटीचे, अपघातात अपंगत्व आल्यास ५० लाखांचे विमा संरक्षण तसेच अपघातात मृत्यू झाल्यास दोन अपत्यांना शिक्षणासाठी दहा लाखांपर्यंत शैक्षणिक सुविधा, रुग्णालयात दाखल झाल्यास ३० हजार रुपयांची वैयक्तिक मदत एचडीएफसी बॅँकेने देऊ केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तालयाने अधिकारी, अंमलदारांना दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 12:18 am

Web Title: police accounts in hdfc bank abn 97
Next Stories
1 ‘रेमडेसिवीर’ करोना उपचारात उपयुक्त
2 ‘टीआरपी’ वाढताच जाहिरातींचा ओघ
3 रत्नागिरी, सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चितीच्या सूचना 
Just Now!
X