सायन येथील एका गणेशोत्सव मंडपाच्या आवारात जुगार खेळणाऱ्यांवर छापा टाकून पोलिसांनी २० जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून ४३ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

सायनच्या प्रतीक्षानगर येथील विश्वनाथ मित्रमंडळाच्या गणेशोत्सव मंडपात जुगार सुरू असल्याची माहिती परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांना मिळाली होती. त्यांनी आपल्या पथकाला पाठवून जुगार खेळणाऱ्या २० जणांना अटक केली. त्यांच्यावर कलम ४(अ) आणि ५ अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारी ४३ हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.