News Flash

समाजमाध्यम खाती हॅक करणारा ताब्यात

महिलेने २५ डिसेंबर रोजी बांगुरनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार नोंदविली.

समाजमाध्यम खाती हॅक करणारा ताब्यात

टीव्ही अभिनेत्रीचे फेसबुक, इन्स्टाग्राम व आयक्लाउड हॅक करून तिची वैयक्तिक माहिती, छायाचित्र आणि ध्वनिचित्रफीत व्हॉट्सअ‍ॅपवर अपलोड करणाऱ्या अल्पवयीन मुलाला पालिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
खाती हॅक करून त्याच्यातील काही माहिती उघड केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने माझ्याकडे आणखी काही छायाचित्र असल्याचे सांगून महिलेकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास खासगी छायाचित्रे इतर सर्व समाजमाध्यमांवर शेअर करून बदनामी करण्याची धमकीही त्याने दिली. या महिलेने २५ डिसेंबर रोजी बांगुरनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार नोंदविली. उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त फत्तेसिंग पाटील यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2015 3:32 am

Web Title: police arrested for computer hakker
Next Stories
1 शाळा मान्यता, मुदतवाढ ऑनलाइन?
2 ‘नेबरहूड विंटर’ची धम्माल
3 विद्यार्थ्यांच्या मेंदूला खाद्य देणारा उपक्रम
Just Now!
X