News Flash

महिलेचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला अटक

या तरुणाची रवानगी न्यायलयीन कोठडीत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबईतील घाटकोपर भागात राहणाऱ्या चाळीस वर्षीय महिलेचा विनयभंग करुन पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. घाटकोपरमध्ये राहणारी महिला अंधेरी येथे पुतण्याच्या उपचारांसाठी डॉक्टरला भेटून परतत होती. असल्फा मेट्रो स्थानकावर ही महिला उतरली. ती मेट्रो स्टेशनच्या बाहेर पडत असताना आरोपी प्रवीण बांद्रे याने गर्दीचा फायदा गेत या महिलेशी अश्लील चाळे केले आणि पळून जाऊ लागला. या प्रकारामुळे संतापलेल्या महिलेने आरडाओरडा केला. ज्यानंतर सुरक्षा रक्षकांनी प्रवीणला ताब्यात घेतले. या महिलेने पोलीस नियंत्रण कक्षाशीही त्वरित संपर्क साधला. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर प्रवीणला अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयात हजरही करण्यात आले. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. प्रवीण बर्वेनगरचा रहिवासी आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 8:28 pm

Web Title: police arrested the youth who molested the woman at the metro station
Next Stories
1 विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन
2 ‘बेस्ट नीट चालवून दाखवा मग राज्याच्या गप्पा मारा’
3 BEST Strike: मनसेने मेट्रो-3 चं काम बंद पाडलं, चेंबूरमध्ये रोखल्या बसेस
Just Now!
X