06 March 2021

News Flash

अंमली पदार्थ तस्करांना अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

या दोघांकडूनही ३ कोटी ४ लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांना अटक केली. मोहम्मद इस्माइल गुलाम हुसैन आणि दयानंद माणिक मुद्दानर अशी या दोघांची नावं आहेत. या दोघांकडून पोलिसांनी २० किलो ३४८ ग्रॅम एफेड्रीन ड्रग जप्त केले. या ड्रगची किंमत सुमारे ३ कोटी ४ लाख ५ हजार इतकी आहे. आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दया नायक आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या दोघांकडे अंमली पदार्थासह १५ हजार ७४० रुपयांची रोकड ही सापडली. सदर एफेड्रीन हे ३१ डिसेंबरच्या पार्टीच्या पार्श्वभूमीवर आणले होते असे या दोघांनी चौकशीत सांगितले आहे. सदर साठा कुणाला देण्यासाठी आणि कुणाकडून आणल्या याचा शोध आणि चौकशी आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दया नायक करत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 9:54 pm

Web Title: police arrested two drug smugglers in mumbai
Next Stories
1 अनोख्या अंदाजात अमृता फडणवीस म्हणत आहेत हॅपी न्यू इयर!
2 ‘बायको असावी शिवसेनेसारखी, लफडी समजली तरी सोडत नाही’
3 आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला कृष्णकुंजवर
Just Now!
X