प्रतिष्ठित नागरिकांची ‘विशेष पोलीस’ म्हणून नियुक्ती

मुंबई : पोलिसांनी करोना विरेाधातील लढाईत सर्वसामान्य नागरिकांना सामावून घेण्यास सुरुवात के ली आहे. मुंबई पोलीस दलाने त्या त्या परिसरात परिचित असलेल्या ११०० प्रतिष्ठित नागरिकांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करून त्यांच्यावर प्रतिबंधित क्षेत्रे, तसेच टाळेबंद इमारतींभोवतीच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपवली आहे.

विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्ती प्रतिबंधक क्षेत्र, टाळेबंद इमारतींभोवती पोलिसांप्रमाणे पहारा देतील. निर्बंध घातलेल्या ठिकाणचे रहिवाशी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करीत आहेत की नाही यावर ते लक्ष ठेवतील. पोलीस प्रवक्ते चैतन्य एस. यांनी दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या इमारतीत पाच किं वा त्याहून जास्त व्यक्ती करोनाबाधित असल्याचे आढळल्यास महापालिका ती इमारत टाळेबंद करते. तसेच मोठय़ा प्रमाणावर रुग्ण आढळलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येतो. प्रतिबंधित क्षेत्र वा टाळेबंद इमारतीमधील रहिवाशांना बाहेर जाता येत नाही. तसेच बाहेरील व्यक्तीलाही तेथे जाण्यास परवानगी नसते. या निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पोलीस अधिकारी म्हणून या नागरिकांना टाळेबंद इमारत आणि प्रतिबंधित क्षेत्राबाहेर तैनात करण्यात येणार आहे. हे विशेष पोलीस अधिकारी प्रतिबंधित क्षेत्रांवर लक्ष ठेवतील, नियम मोडू पाहणाऱ्या नागरिकांना सूचना देऊन इमारतीबाहेर पडण्यापासून रोखतील. नागरिकांनी न जुमानल्यास विशेष पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यास कळवतील. या तक्रोरीआधारे पोलीस नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करतील.

सध्या शहरातील १३ परिमंडळे आणि ९४ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून ११०० विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे चैतन्य यांनी सांगितले. ही नियुक्ती ३१ मेपर्यंत वैध असेल. मुदत वाढविण्याचा निर्णय तेव्हाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. मात्र ३१ मेपर्यंत आवश्यकता भासल्यास आणखी नियुक्त्या के ल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट के ले.

या नियुक्त्यांसाठी पोलीस ठाण्यांच्या पातळीवर स्वच्छ चारित्र्य असलेल्या, परिसरात ओळख असलेल्या व्यक्तींची नावे उपायुक्त कार्यालयांना पाठवण्यात आली. उपायुक्तांनी  पडताळणी करून त्यापैकी काहींना विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त के ल्याचे प्रमाणपत्र जारी के ले. तसेच या व्यक्तींना त्यांची जबाबदारी समजावून सांगितली. गेल्या वर्षी प्रतिबंधित क्षेत्रांभोवती पहारा देण्याची जबाबदारी पोलिसांवरच होती. पोलीस दलात करोना वेगाने पसरत होता. परिणामी, मनुष्यबळ कमी झाले. पोलीस दलावरील ताण वाढला. विशेष पोलीस अधिकारी या योजनेमुळे पोलिसांवरील ताण कमी होऊ शके ल, असे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.