व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येपूर्वी मुंबई पोलीस आयुक्तालयात झालेल्या संशयास्पद हालचालींची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) हाती लागली असून त्यांचा या गुन्ह््याशी संबंध आहे का, हे पडताळण्यात येत आहे. पश्चिाम उपनगरातील एका डान्सबारच्या मालकाची गुरुवारी झालेली चौकशी याच पडताळणीचा भाग असल्याचे सांगण्यात आले.

मनसुख यांची ४ मार्चच्या रात्री हत्या झाली. या गुन्ह््यात अटक करण्यात आलेला पोलीस शिपाई विनायक शिंदे हा २ आणि ३ मार्चला पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागात (सीआययु) आल्याचे आढळले. उद्योगपती मुके श अंबानी धमकी आणि मनसुख हत्या दोन्ही गुन्ह््यांतील प्रमुख आरोपी सचिन वाझे अटके पूर्वी ‘सीआययु’चे प्रमुख होते. २ मार्चला ‘सीआययु’ कार्यालयात वाझे, शिंदे यांच्यासह राजकारणात कारकीर्द घडविण्यासाठी धडपडणारा माजी पोलीस अधिकारी उपस्थित होता. काही तास सीआययुत घालविल्यानंतर त्याने पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट घेतली, अशी माहिती ‘एनआयए’ला मिळाली.

पश्चिाम उपगनरातील बार मालक ३ मार्चला आपल्या पांढऱ्या मर्सिडीज गाडीतून पोलीस आयुक्तालयात आला. सुमारे चार तास तो सीआययु कार्यालयात होता. तेव्हा तेथे वाझे, शिंदे यांच्यासह गुन्हे शाखेतील एक प्रभारी पोलीस निरीक्षकही उपस्थित होता. निवृत्त पोलीस अधिकारी, बार मालक हे २ आणि ३ मार्चला पोलीस आयुक्तालयात का आले, सीआययुत त्यांचा वावर कशासाठी होता, आदी माहिती मिळवण्याचा प्रयत्ना सुरू असल्याचे एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्या दृष्टीने गुरुवारी या बार मालकाकडे चौकशी के ल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

याशिवाय ४ मार्चला मनसुख यांच्या हत्येच्या काही तास आधी मुख्य आरोपी वाझे यांच्याही संशयास्पद हालचाली ‘एनआयए’ला आढळल्या आहेत. हत्येपूर्वी ते पोलीस आयुक्तालयापासून जवळ चालत जाताना, एका गाडीत बसतानाचे सीसीटीव्ही चित्रण तपास यंत्रणांच्या हाती लागले आहे.