News Flash

गुरुनाथ मयप्पन, विंदू दारा सिंगच्या पोलिस कोठडीत वाढ

अतिरिक्त महानगरदंडाधिकारी ए. ए. खान यांनी या दोघांची पोलिस कोठडी ३ जूनपर्यंत वाढविण्याचे आदेश दिले.

| May 31, 2013 05:08 am

आयपीएलमधील सट्टेबाजीच्या रॅकेटप्रकरणी अटकेत असलेला चेन्नई सुपर किंग्जचा मालक गुरुनाथ मयप्पन, अभिनेता विंदू दारा सिंग यांच्यासह अल्पेशकुमार पटेल आणि प्रेम तनेजा यांच्या पोलिस कोठडीत शुक्रवारी तीन दिवसांची वाढ करण्यात आली. अतिरिक्त महानगरदंडाधिकारी ए. ए. खान यांनी या दोघांची पोलिस कोठडी ३ जूनपर्यंत वाढविण्याचे आदेश दिले. 
आयपीएलमधील सट्टेबाजीप्रकरणी देशातून फरार झालेल्या सट्टेबाजांशी या दोघांचे आणखी काय काय संबंध होते, हे शोधून काढायचे असल्याने या दोघांच्या पोलिस कोठडीत सरकारी वकिलांनी वाढ करण्याची मागणी केली. बचाव पक्षाच्या वकिलांनी पोलिस कोठडी वाढविण्याला विरोध केला. या दोघांवर ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय, ती जामीनपात्र आहेत. तसेच त्यांनी बराचवेळ पोलिस कोठडीत घालवला आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. महानगरदंडाधिकाऱयांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर पोलिस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 5:08 am

Web Title: police custody of meiyappan vindoo extended till june 3
Next Stories
1 बिल्डर सुरेश बिजलानीच्या जामीनावर सर्वाच्च न्यायालयाची स्थगिती
2 पावणेदोनशे कोटींचा भाडेपट्टय़ाचा भूखंड बिल्डरच्या घशात?
3 मी असतो तर असे घडू दिले नसते
Just Now!
X