13 August 2020

News Flash

देवनार आगप्रकरणी दोन आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

पोलिसांनी रफीक व आतिक या दोन आरोपींना आज सकाळी अटक केली होती.

देवनार कचरा डेपोला वारंवार लागणा-या आगप्रकरणी पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
देवनार आगप्रकरणी पोलिसांनी रफीक व आतिक या दोन आरोपींना आज सकाळी अटक केली होती. त्यानंतर या दोघांनाही पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने या दोघांनाही २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. केवळ पैशांच्या हव्यासापोटी या दोघांनी भंगार विक्रेत्यांना जबरदस्तीने डंपिंग ग्राऊंडमध्ये आग लावण्यास सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे दोघेही देवनार डंपिंग ग्राऊंडच्या आसपासच्या परिसरातच राहतात, असेही समजते.
यापूर्वी पोलिसांनी एकूण १३ भंगार विक्रेत्यांना आग लावल्याप्रकरणी अटक केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2016 2:17 pm

Web Title: police custody to two main accused for deonar dumping ground fire
Next Stories
1 हाजी अराफत शेख यांचे मत हे पक्षाचे अधिकृत मत नाही- नीलम गोऱ्हे
2 ‘तृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यात आल्यास त्यांना चपलेचा प्रसाद देऊ’
3 BLOG : तुम्हाला वाचनाची आवड आहे ?
Just Now!
X