30 September 2020

News Flash

मंत्र्याच्या भगिनीला आंदोलन करण्यास पोलिसांचा मज्जाव

पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली.

(संग्रहित छायाचित्र)

कारवाईच्या मागणीबाबत सत्ताधारी- विरोधकांमध्ये चकमक

मुंबई : पोलिसांनी एका मंत्र्याच्या भगिनीलाच दमबाजी करून आझाद मैदानातील आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप विरोधकांनी शुक्रवारी विधानसभेत केला. पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली.

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. उपोषण करणाऱ्या संघटना आणि त्यांच्या नेत्यांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत उपोषण करता येईल असे सांगून  त्यांना उपोषणस्थळावरून सक्तीने उठविले जात आहे.

विधिमंडळात आपले प्रश्न मांडले जावेत यासाठी राज्यातून संघटना, सामान्य नागरिकांनी आझाद मैदानात ठिय्या दिला आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या सख्ख्या भगिनी संगीता शिंदे या शिक्षकांच्या मागण्यांसाठी आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत. १९९५ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी निवृत्ती योजना लागू करावी, अशी त्यांची मागणी आहे. मात्र त्यांच्या मागणीची दखल घेण्याऐवजी पोलीस त्यांना आंदोलन करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेचे विजय वडेट्टीवार यांनी केला.

सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच उपोषण करता येईल, असे सांगत पोलीस तेथील आंदोलकांना संध्याकाळी आझाद मैदानातून हाकलून देत आहेत. मग या लोकांनी रात्री थांबायचे कोठे, असा सवाल करीत सरकार पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन करण्याच्या लोकशाही अधिकारावर घाला घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर, हे सगळे प्रश्न तुमच्या काळातील असून ते सोडविण्यासाठी वेळ लागतोय, असे उत्तर देत पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनी विरोधकांचा हल्ला परतवून लावला. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी पीठासनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेत सरकार आणि पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली.

कदम यांचा वादात हस्तक्षेप

या वादात अखेर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी  हस्तक्षेप करीत आंदोनलकर्त्यांची भेट घेऊन त्यांची शिक्षणमंत्र्यासमवेत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले आणि या वादावर पडदा टाकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2019 4:14 am

Web Title: police do not allow sister of minister to protest at azad maidan
Next Stories
1 आत्महत्येची माहिती आरोपींना कशी ? तडवी कुटुंबाचा न्यायालयात सवाल
2 नऊ ‘न्हाणीघरां’च्या सरकारी लाभार्थीच्या निलंबनाची शिफारस!
3 काँग्रेस-राष्ट्रवादीने २५ मतदारसंघांत मुस्लिमांना उमेदवारी द्यावी!
Just Now!
X