19 September 2020

News Flash

बॉम्बशोधक पथकातील मॅक्स श्वानाचा मृत्यू

मॅक्सला सहा महिन्यांचा असताना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली.

Police dog Max: दहशतवाद्यांनी फेकलेले परंतु, स्फोट न झालेला एक आयईडी आणि हँडग्रेनेड शोधण्यात मॅक्सने मदत केली. मे २०१५ मध्ये मॅक्स सेवेतून निवृत्त झाला होता.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हॉटेल ताज येथे एक आयईडी आणि हँडग्रेनेड शोधून शेकडो मुंबईकरांचे जीव वाचवणारा मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकातील मॅक्स या श्वानाचा शुक्रवारी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. ऑक्टोबर २००४ सालचा जन्म असलेल्या मॅक्सला सहा महिन्यांचा असताना पोलीस दलासाठी प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली. सहा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर ऑक्टोबर, २००५ मध्ये मॅक्स पोलीस दलाच्या बॉम्बशोधक व नाशक पथकात दाखल झाला. आपल्या दशकभराच्या सेवेत २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मॅक्सने केलेली कामगिरी उल्लेखनीय होती. हॉटेल ताजमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांनी फेकलेले परंतु, स्फोट न झालेला एक आयईडी आणि हँडग्रेनेड शोधण्यात मॅक्सने मदत केली. मे २०१५ मध्ये मॅक्स सेवेतून निवृत्त झाला होता. तेव्हापासून त्याच्या पुढील सांभाळासाठी फिझा शहांकडे सोपविण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 4:36 pm

Web Title: police dog max who saved lives during mumbai attack passes away
Next Stories
1 भाजपचा कारभारही काँग्रेससारखाच!
2 आयत्या वेळी विषयात अंधेरी आरटीओ प्रकल्प मंजूर!
3 मुंबईच्या तापमानात वाढ
Just Now!
X