करोनाच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने लागू केलेल्या वा लागू के ल्या जाणाऱ्या कठोर निर्बंधांबाबतच्या विरोधाची धार कमी करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी व्यावसायिक, लोकप्रतिनिधींसह समाजातील मान्यवरांचे समूह तयार करून त्यांच्याशी ‘अ‍ॅप’द्वारे चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.

प्रत्येक विभागातील करोनाबाधितांची संख्या, गर्दीची ठिकाणे, प्रतिबंधात्मक उपाय इत्यादींवर चर्चा घडवून निर्बंधांबाबत विरोधाची धार कमी करण्यासोबत अडचणीच्या वेळी त्वरित माहिती तसेच सहकार्य मिळणे हा या मोहिमेमागील हेतू असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

या मोहिमेचा भाग म्हणून पोलीस ठाण्यांतील बीट चौक्यांचे प्रमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्तांनी आपापल्या अधिपत्याखालील क्षेत्रांमधील मान्यवर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते, व्यावसायिकांचे ‘व्हॉट्सअ‍ॅप’ समूह तयार करण्यास सुरुवात के ली आहे. या समूहांमधील सदस्यांची ‘झूम’ किं वा अन्य ‘अ‍ॅप’द्वारे बैठक घेतली जात आहे. त्यात निर्बंधांना विरोध का, निर्बंधांचे काटेकोर पालन के ल्यास संसर्ग प्रसार कसा थांबेल, विभागातील करोनाबाधितांची संख्या, उपचार केंद्र, सोयीसुविधांबाबत चर्चा घडवून आणली जात असून त्याआधारे मतप्रवाह जाणून घेण्याचा प्रयत्ना सुरू आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अशा बैठका सुरू झाल्या असून त्यात अधूनमधून सहआयुक्त दर्जाचे अधिकारीही सहभागी होत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या आठवड्यात राज्य सरकारने नवे निर्बंध जारी के ले होते.

पहिल्या दिवशी निर्बंधांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. व्यावसायिक निर्बंधांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. निर्बंधांना असलेला विरोध, असंतोष मावळावा यासाठी ही उपायायोजना के ली गेली आहे. विरोध, असंतोष मावळल्यास निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी सहजशक्य होईल. अशा चर्चांमुळे करोनाबाधित व्यक्तींना लागलीच उपचार मिळवून देण्यासोबत कायदा व सुव्यवस्थेचा प्रशद्ब्रा निर्माण झाल्यास त्याची माहिती पोलिसांना लागलीच मिळू शकेल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.