News Flash

दादर येथील हत्या आणि चोरीच्या गुन्ह्य़ाची उकल

मनोज वर्मा असे आरोपीचे नाव आहे.

जयभीम भालेराव या नराधमाला अटक करण्यात आली.

दादर (पश्चिम) येथे एका महिलेची हत्या करून तिच्या घरातून सुमारे दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व भ्रमणध्वनी चोरी करून फरारी झालेल्या आरोपीला शिवाजी पार्क पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे. मनोज वर्मा असे आरोपीचे नाव आहे. लुईस कोर्ट येथे राहणाऱ्या बेलिजा टॉमी काडरेजो (५३) यांची हत्या करून आरोपीने १ लाख, ५ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबवला होता. बोलिजा यांच्या घरी काही दिवसांपूर्वी फर्निचर दुरुस्तीचे काम सुरू होते. हे काम करणाऱ्यासाठी येणाऱ्या सर्व कामगारांची चौकशी करण्यात आली. त्यांपैकी मनोज वर्मा याचीही चौकशी करण्यात आली. मुंबईतील त्याच्या घरी तो आढळून आला नाही. त्यामुळे ही हत्या व चोरी त्यानेच केल्याचे तपासात पुढे आले. पोलिसांच्या एका पथकाने त्याला उत्तर प्रदेशात जाऊन अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 7:08 am

Web Title: police find out the killer from up
Next Stories
1 म्हाडाच्या ५६ वसाहतींच्या पुनर्विकासावर अखेर तोडगा!
2 मुंबईकरांची पाडय़ावरची दिवाळी
3 १५ वर्षांनी पुन्हा एकदा पक्षी गणना
Just Now!
X