News Flash

Video: मुंबईत २१ हजार रुपयांच्या कांद्याची चोरी; दोघांना अटक

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

मुंबई : कांदा चोरताना चोर सीसीटीव्हीत कैद.

जीवनावश्यक वस्तू असलेल्या कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने सध्या किरकोळ बाजारातील कांद्याच्या दाराची सर्वत्र चर्चा आहे. मोठा भाव आल्याने कांद्याच्या चोरीचे प्रकार घडताना दिसत आहेत. अशीच एक कांदा चोरीची घटना मुंबईतील डोंगरी भागात पाच दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेत चोरट्यांनी दोन दुकानांमधून तब्बल २१ हजार रुपयांचा कांदा चोरुन नेला होता. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

डोंगरी भागातील एका भाजी मार्केटमध्ये ५ डिसेंबर रोजी कांदा चोरीची ही घटना घडली होती. इथल्या दोन दुकांनांमधून दोन चोरट्यांनी २१,१६० रुपये किंमतीचा कांदा चोरुन नेला होता. एकामागून एक कांद्याची पोती त्यांनी खांद्यावरुन वाहून नेली होती. याचे चित्रण सीसीटीव्हीत झाले असून पोलिसांनी यावरुन दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 9:35 am

Web Title: police have arrested two men for stealing onions worth rs 21160 from dongri area of mumbai aau 85
Next Stories
1 माथाडी मंडळाच्या पाच कोटींचा अपहार
2 अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षित जागांना दहा वर्षे मुदतवाढ
3 महिला मोटरमनच्या हाती वातानुकूलित लोकल
Just Now!
X