02 March 2021

News Flash

पोलीस निरीक्षकला लाच घेताना अटक

गोरेगाव युनिट क्र. २ येथे असलेल्या खोलीच्या मालकीवरून दोन जणांमध्ये वाद सुरू आहे.

अटकपूर्व जामीन मिळालेल्या आरोपीकडून जामिनाच्या हमीची पडताळणी करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरे पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला लाच प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. दिवाकर सावंत (४९) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
गोरेगाव युनिट क्र. २ येथे असलेल्या खोलीच्या मालकीवरून दोन जणांमध्ये वाद सुरू आहे. या वादातून खोलीची आधीची मालकीण तसेच आताचा मालक आणि त्याचे कुटुंबीय यांच्यावर आरे सब पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सध्याचा मालक असलेली व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांना या गुन्ह्य़ात अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून त्यासाठी दिली जाणारी हमी परिपूर्ण नव्हती. यासाठी पोलीस निरीक्षक दिवाकर सावंत यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली. या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. आणि कारवाईत सावंत रंगेहाथ सापडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2016 12:09 am

Web Title: police inspector arrested while taking bribe
टॅग : Police Inspector
Next Stories
1 मालेगाव स्फोटातील कागदपत्रे गहाळ झाल्याबद्दल टीका
2 महानंदच्या अध्यक्षपदी मंदाकिनी खडसे
3 मार्डचा राज्यभरात बेमुदत सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा
Just Now!
X