20 January 2021

News Flash

ट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’

महिन्यात दुसरी कारवाई

प्रतीकात्मक छायाचित्र

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : मारहाण, खंडणी, ठार मारण्याची धमकी, अतिक्र मण, अमली पदार्थाची विक्री असे असंख्य गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या संघटित टोळीविरोधात ट्रॉम्बे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई के ली. महिनाभरात ट्रॉम्बे पोलिसांनी के लेली ही दुसरी कारवाई आहे.

गेल्या महिन्यात चिता कॅम्प परिसरात अब्दुल रेहमान शेख या तरुणाची हत्या करण्यात आली. या गुन्ह्य़ाच्या तपासात सराईत गुन्हेगार रशिद शेख आणि त्याच्या टोळीने गेल्या दहा वर्षांत परिसरात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण केली. या दहशतीचा वापर रशिद आणि टोळीने खंडणी उकळण्यासाठी केला. अधिकाधिक दहशत निर्माण करण्यासाठी रशिद याने संघटित टोळी तयार केली. ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिद्धेश्ववर गोवे यांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळीविरोधात ३८ गुन्ह्य़ांची नोंद आहे. त्यामुळे या टोळीविरोधात मोक्कान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यास अतिरिक्त आयुक्तांनी मंजुरी दिली. त्यानुसार सोमवारी मोक्कान्वये

गुन्हा नोंदवून रशिद शेख, जाहिदअली सय्यद, जावेद शेख, मोहम्मदअली सय्यद, फै जलउल्ला शेख यांच्यासह फरजाना सय्यद, आतीफ शेख, अली शेख यांना अटक करण्यात आली.

महिनाभरातील मोक्कान्वये करण्यात आलेली ही दुसरी कारवाई असून भविष्यातही हद्दीतील संघटित टोळ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे गोवे यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2020 3:08 am

Web Title: police invoke mcoca against criminal gang trombay dd70
Next Stories
1 झोपु योजनेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांविरुद्ध कारवाई
2 अंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा
3 उपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला
Just Now!
X