मुंबईमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असणारा हा अधिकारी चेंबूर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. सोमवारी संध्याकाळी स्टोअर रुममध्ये गळफास लावून घेत त्यांनी आत्महत्या केली. पोलिसांना यावेळी सुसाइट नोट सापडली आहे.

चेंबूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयप्रकाश भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, “१२.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय गावडे यांना काही कामानिमित्त बोलावण्यासाठी गेला असता त्यांचा मृतदेह आढळून आला. स्टोअर रुममध्ये त्यांनी कपड्याच्या सहाय्याने गळफास लावून घेतला होता. रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. गावडे यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. मुलीचं लग्न झालेलं असून मुलगा एका खासगी कंपनीत कामाला आहे”.

illegal quarry operator in panvel
पनवेलमध्ये बेकायदा दगडखाण चालविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

३१ मे रोजी दत्तात्रय गावडे निवृत्त होणार होते. सुसाइट नोटमध्ये दत्तात्रय गावडे यांनी कॅन्सरमुळे होत असलेल्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. जयप्रकाश भोसले यांनी सांगितल्यानुसार, दत्तात्रय गावडे गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत होते. फेब्रुवारी महिन्यात त्यांच्यावर सर्जरीही झाली होती. पण गेल्या नोव्हेंबर महिन्यात पुन्हा त्यांना आजाराने ग्रासलं.

त्यांच्या आजाराची कल्पना असल्याने त्यांना स्टोअर रुममध्ये पोस्टिंग देण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.