विक्रोळी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले ४१ वर्षीय पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील यांचा गुरुवारी करोना संसर्गाने वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात मृत्यू झाला.
संसर्गाने मृत्य झालेल्यांपैकी पाटील हे दुसरे तरूण पोलीस अधिकारी आहेत. याआधी धारावी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अमोल कुलकर्णी (३६) यांचा १६ मे रोजी ला संसर्गाने राहत्या घरीच मृत्यू झाला होता.
पाटील मुळचे सांगलीचे असून सध्या कळवा येथे पत्नी, मुलासोबत वास्तव्यास होते. करोनाबाधीत असल्याचे स्पष्ट होताच ५ जुलैला त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. फुफुस्सांमध्ये संसर्ग पसरल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना रेमडेसिवीर औषध देण्यात आले होते.
शारिरिक दृष्टय़ा सशक्त असलेले पाटील करोनावर सहज मात करू शकतील, असा त्यांच्या सहकारी, वरिष्ठांना विश्वास होता. त्यामुळे गुरुवारी त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच सर्वाना धक्का बसला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 10, 2020 12:39 am