30 September 2020

News Flash

पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांना विशेष पुरस्कार

नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले असतानाही गडचिरोली जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांना निवडणूक आयोगाने विशेष पुरस्कार देऊन गौरविले

| January 26, 2015 01:42 am

नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले असतानाही गडचिरोली जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांना निवडणूक आयोगाने विशेष पुरस्कार देऊन गौरविले आहे.
गडचिरोलीमध्ये निवडणूक शांततेत पार पाडण्याचे मोठे आव्हान होते. मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार करून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाला  यावे म्हणून गडचिरोलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक हक यांनी नियोजन केले होते.
त्यांच्या या कामाचा गौरव करण्यात आला आहे. नवी दिल्लीत रविवारी झालेल्या समारंभात विशेष पुरस्कार देऊन हक यांना गौरविण्यात आले. मूळचे काश्मिरचे असलेल्या हक यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असताना नक्षलवाद्यांशी सामना केला होता तसेच नक्षलवादी कारवायांना आळा  घालण्याकरिता प्रयत्न केले होते.
धडाडीच्या अशा या अधिकाऱ्याची मात्र नव्याने निर्मिती झालेल्या पालघर या जिल्ह्यात अधीक्षक म्हणून नेमणूक करून शासनाने अन्याय केल्याची भावना मंत्रालयात व्यक्त केली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2015 1:42 am

Web Title: police officer suvez haque gets special police medal
Next Stories
1 अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत बुद्धिवंतांची भूमिका पक्षपाती
2 माझ्या जगण्याला गांधी विचारांचे अधिष्ठान -रामदास भटकळ
3 अभावावर मात करून आयुष्य ‘घडविणारी’शाळा!
Just Now!
X