ओला व उबर चालकांकडून भारतमाता ते विधानभवनापर्यंत काढण्यात येणारा मोर्चा पोलिसांनी गुंडाळला आहे. हा मोर्चा आज (सोमवार) सकाळी १० वाजता भारतमाता येथून निघणार होता. परंतु, पोलिसांनी मोर्चा निघण्यापूर्वीच आंदोलकांना ताब्यात घेतले. मोर्चा नेऊ शकत नाही, असे सांगत पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानावर नेले.
ओला, उबर चालकांचा दिवाळीपूर्वी १२ दिवस सुरू राहिलेला संप परिवहन विभागाशी झालेल्या चर्चेनंतर १५ नोव्हेंबरपर्यंत स्थागित करण्यात आला होता. त्यानंतर मागण्यांवर दोन दिवसांत परिवहन विभाग व ओला, उबर व्यवस्थापनाने निर्णय घ्यावा, अन्यथा संप करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आणि मराठी कामगार सेनेने दिला होता. तोडगा न निघाल्याने ओला, उबर टॅक्सी चालक-मालकांच्या संघटनेने संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता.
काय आहेत मागण्या
संघटनेकडून १३ मागण्या मांडण्यात आल्या असून यामध्ये मिनी, मायक्रो, गो गाडय़ांमध्ये प्रति किलोमीटर १२ रुपयांऐवजी ५० रुपये बेस फेअर द्यावा, प्रतीक्षा कालावधी दर दोन रुपये मिळावा आदी मागण्यांचा समावेश आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 19, 2018 10:25 am