News Flash

५५ लाखांची फसवणूक

कर्ज बुडविल्याने बँकेने म्हाडाची घरे जप्त केली आहेत. १० टक्के रक्कम भरल्यास कर्ज मिळवून देण्याच्या बोलीवर २३ जणांना ५५ लाख रुपयांना फसवणाऱ्या

| November 15, 2013 05:01 am

कर्ज बुडविल्याने बँकेने म्हाडाची घरे जप्त केली आहेत. १० टक्के रक्कम भरल्यास कर्ज मिळवून देण्याच्या  बोलीवर २३ जणांना ५५ लाख रुपयांना फसवणाऱ्या तोतया बँक संचालकाचा शोध येथील पोलीस घेत आहेत. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे. राजेश ओझा हा एचडीएफसी बँकेचा संचालक असल्याची बतावणी करायचा. तो फरार आहे. सायन येथील  प्रतीक्षानगरात म्हाडाची घरे असून तेथे कर्ज बुडविलेल्या सदनिकाधारकांची घरे जप्त केली आहेत, असे गरजूंना तो सांगायचा. त्याच्या या थापांना भूलत डोंबिवलीतील १९ जण तर नवी मुंबईतील तीन, सांताक्रूझ येथील एक अशा २३ जणांनी त्याच्याकडे ५५ लाख रुपये सोपवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डोंबिवलीतील कीर्तिकुमार ठक्कर यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 5:01 am

Web Title: police searching for fraud bank director cheats warth 55 lakhs
Next Stories
1 एचआयव्ही रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपण
2 एक लेखक, तीन पुस्तके अन् २० लाख प्रतींची विक्री!
3 ठाणेकर फडक्यांनी जपल्या डोंबिवलीकर ‘सचिन’च्या स्मृती!
Just Now!
X