News Flash

विवाहिता आत्महत्याप्रकरणी पोलिसाच्या मुलास अटक

साकीनाका येथे शुक्रवारी एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली होती.

साकीनाका येथे शुक्रवारी एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणी तिच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून साकीनाका पोलिसांनी भूषण लहाने या तरुणाला अटक केली आहे. भूषण हा निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त भगवान लहाने यांचा मुलगा आहे.
पीडित महिला ३५ वर्षांची असून तिला दहा वर्षांचा मुलगा आहे. शुक्रवारी तिने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. माझ्या पत्नीच्या आत्महत्येस भूषण लहाने जबाबदार असल्याचा आरोप तिच्या पतीने केला होता. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केल्यानंतर भूषण आणि तिची मैत्री असल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच दोघांच्या मोबाइलची तपासणी केली असता दोघे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले होते.
या प्रकरणी आम्ही भूषण याला अटक केल्याची माहिती साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 2:53 am

Web Title: police son arrested in married woman suicide case
Next Stories
1 कल्याणमधील २७ गावे महापालिकेतून वगळली, नवी नगरपालिका होणार
2 रायगडमध्ये सापडलेले अवशेष शीनाचेच
3 देशातील बँका धनदांडग्यांसाठी गरिबांसाठी स्वतंत्र बँकांची गरज
Just Now!
X