करोनाबाधित हवालदाराच्या मुलाची तक्रोर; तक्रोर तथ्यहीन असल्याचे चौकशीनंतर स्पष्ट

मुंबई : धोकादायक वयोगटातील (५५ वर्षांपुढील) अंमलदारांना घरी राहाण्याचे स्पष्ट आदेश असूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनमानी करत कामावर बोलावल्याने वडील आणि कुटुंब करोनाबाधित झाले, अशी तक्रोर एका पोलीसपुत्राने गृहमंत्र्यांकडे केली. मात्र या तक्रारीत तथ्य नसल्याचा दावा पोलीस दलाने केला.

या तक्रोरीच्या निमित्ताने सवलतीचा गैरफायदा, खात्यांतर्गत बढती, पन्नाशी उलटलेल्या अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण  हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले.पूर्व उपनगरातील कार्यरत करोनाबाधित हवालदाराच्या मुलाने २९ जूनला समाजमाध्यमांद्वारे ही तक्रोर के ली. ५७ वर्षांच्या वडिलांना कर्तव्यावर बोलावण्यात आले, जनसंपर्क होईल अशा ठिकाणी बंदोबस्त दिला. त्यामुळे त्यांच्यासह संपूर्ण कु टुंब बाधित झाले, असा आरोप मुलाने के ला. समाजमाध्यमावरील ही तक्रोर संबंधित प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी पाहिली आणि तातडीने चौकशीचे आदेश दिले.

एप्रिल अखेरीस ५५ वर्षांपुढील सर्व अंमलदारांना (सहायक उपनिरीक्षकापर्यंत) कर्तव्यावर बोलावू नका, असे आदेश आयुक्तालयाने जारी के ले. मात्र ६ जूनला शासकीय कर्मचाऱ्यांनी आठवडय़ातून किमान एक दिवस कामावर हजर राहावे, असा आदेश दिला. या आदेशानंतरच ५५ वर्षांपुढील अंमलदारांना आठवडय़ातून एकदा हजेरी लावण्यापुरते कामावर बोलाण्यात आले. संबंधित हवालदाराने जून महिन्यात तीनदा हजेरी लावली. २९ जूनलाही हजेरी लावणे अपेक्षित होते. मात्र करोनाबाधित रुग्ण आढळल्याने ते वास्तव्य करत असलेली इमारत प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाली, हे त्यांनी कळविल्याने त्यांना घरीच राहाण्याच्या सूचना दिल्या गेल्या.  दुसऱ्या दिवशी इतरांसोबत त्यांची चाचणी के ली तेव्हा तेही बाधित आढळले. कामावर बोलावल्यावरही त्यांना जनसंपर्क होणार नाही अशा ठिकाणी, अत्यंत हलके  फु लके  काम देण्यात आले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या इमारतीतच संसर्ग झाला असावा, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त रवींद्र पाटील यांनी दिली.

खात्यांतर्गत बढती मिळालेल्यांचे हाल

पोलीस शिपाई म्हणून भरती झालेले आणि सरळ सेवा किं वा खात्यांतर्गत परीक्षा देऊन उपनिरीक्षक म्हणून बढती मिळालेल्यांना ही सवलत नाही. मुळात अंमलदारांचे वय बढती मिळेपर्यंत  ५५ वर्षे किं वा त्याहून जास्त असते. त्यामुळे निवृत्तीला काही दिवस उरलेले उपनिरीक्षक नाकाबंदीपासून आरोपींची करोना चाचणी करून आणण्यापर्यंत हरप्रकारचे कर्तव्य बजावत आहेत.  विशेष म्हणजे प्रत्येक पोलीस ठाण्यातील बहुसंख्य वरिष्ठ निरीक्षक, सहायक आयुक्त ५५च्या पुढे आहेत. त्यांनाही ही सवलत नाही. या तक्रोरीनंतर उद्विग्न पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या प्रतिक्रि येनुसार सफाई कामगार, एसटी किं वा बेस्ट कामगारांनाही ही सवलत नाही. तरीही ते काम करत आहेत.

सवलतीचा गैरफायदा

घरीच राहाण्याची सवलत मिळाल्यानंतर ५५ वर्षांपुढील अनेक अंमलदार गावी निघून गेले. काहींनी कु टुंबाला गावी सोडून परत येतो, असे कळवून एक दिवसाची सुटी घेतली. मात्र गावाकडील ग्रामपंचायत किं वा यंत्रणांनी गृह/संस्थात्मक विलगीकरणात ठेवल्याने मुंबईला येणे शक्य नाही, असे कळवले. शहरातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ आधीच अपुरे आहे. त्यात बाधीत, बाधितांच्या संपर्कात आलेले, गंभीर विकार असलेल्या आणि ५५ वर्षांपुढील अंमलदार कमी झाल्याने पोलीस ठाण्याचे मनुष्यबळ निम्म्यावर आले. अशात प्रतिबंधित क्षेत्रे वाढू लागली, संसर्ग प्रतिबंधासाठी नवनवीन उपाययोजना सुरू झाल्या. अशा परिस्थितीत मनुष्यबळ आणायचे कोठून, असा प्रश्न शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासमोर रोज उभा राहतो. १२ तास काम के ल्यानंतर २४ तास आराम ही पद्धतही अनेक अंमलदारांना मान्य नाही, असेही हे अधिकारी स्पष्ट करतात.