27 February 2021

News Flash

अंधेरीजवळ ट्रकची पोलिस व्हॅनला धडक; एका पोलिसाचा मृत्यू

अंधेरीमध्ये पोलिस व्हॅनला ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेमध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलचा सोमवारी मध्यरात्री मृत्यू झाला.

| February 26, 2013 10:05 am

अंधेरीमध्ये पोलिस व्हॅनला ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेमध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलचा सोमवारी मध्यरात्री मृत्यू झाला. या अपघातात सुमारे ३० पोलिस जखमी झाले आहेत. जखमींमध्ये १० महिलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.
बिस्लेरी जंक्शनजवळ हा अपघात घडला. युसूफ काझी असे मृत पावलेल्या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. जखमींवर व्ही. एन. देसाई आणि कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघाताचे स्वरुप भीषण होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
(संग्रहित छायाचित्र) 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2013 10:05 am

Web Title: police van caught in an accident near andheri one dead
Next Stories
1 शिक्षकांना आता पाणवठे शोधण्याचे काम
2 मुंबई पोलिसांची आता चकमकींना सुट्टी!
3 मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा अजब कारभार!
Just Now!
X