क्रॉफर्ड मार्केटजवळील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजना

मुंबई : क्रॉफर्ड मार्केटच्या परिघात प्रवाशांना उतरवण्याच्या किंवा बसविण्याच्या निमित्ताने ३० सेकं दांहून अधिक काळ रेंगाळणाऱ्या टॅक्सी, खासगी वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू के ली आहे. क्रॉफर्ड मार्केटभोवती होणारी कोंडी फोडण्यासाठी यासह अनेक उपाय वाहतूक पोलिसांनी योजले आहेत.

महात्मा फु ले मंडई अर्थात क्रॉफर्ड मार्केट परिसरात विविध वस्तूंच्या घाऊक बाजारपेठा असून येथे सणासुदीत खरेदीनिमित्त ग्राहक गर्दी करतात. यंदा करोनानिमित्त लादलेले लोकल प्रवासावरील निर्बंध अद्याप उठविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे खरेदीसाठी या घाऊक बाजारपेठांमध्ये येण्यासाठी खासगी, प्रवासी वाहनांसह अन्य पर्याय नागरिकांकडे नाहीत. परिणामी या परिसरात वाहनांची गर्दी होते. वाहनतळ अपुरी पडल्याने किं वा दर परवडत नसल्याने बहुतांश वाहने रस्त्याकडेला अवैध उभी केली जातात. विविध वस्तूंच्या घाऊक बाजारपेठा परिसरात असल्याने मालवाहू मोटारी, हातगाडीवरून मालाची ने-आण करणारे माथाडी, पदपथांवर व्यवसाय मांडून ग्राहकांना आकर्षित करणारे फेरीवाले, पदपथावरला पसारा टाळण्यासाठी रस्त्यांवरून चालणारे पादचारी, खरेदी आटोपल्यावर वाहनाच्या प्रतीक्षेत रस्त्यांवर गर्दी करणारे ग्राहक आदी परिस्थिती या परिघातल्या प्रत्येक मार्गावरील वाहनांची रहदारी रोखते. संध्याकाळी दक्षिण मुंबईतील कार्यालयांतून उपनगरांकडे जाणारी वाहने आणि त्याचवेळेस खरेदीसाठी उपनगरांमधून दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या वाहनांमुळे मार्केटच्या भोवताली चिंचोळय़ा मार्गावर दिवसभर कोंडी होते.

ती फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम, उपाययोजना हाती घेतल्या आहेत. बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांचा रहदारीला अडथळा होऊ नये यासाठी पोलिसांनी बॅरिके ड्स उभारून ठरावीक अंतरापर्यंत खरेदीनिमित्त होणारी गर्दी आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न के ला. गेल्या आठवडय़ात वाहतूक पोलिसांकडून रस्त्याकडेला अवैधरीत्या उभे के ले जाणारे प्रत्येक वाहन जप्त करण्यास सुरुवात झाली. महापालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधून या परिघातील पदपथ फे रीवालामुक्त करण्यात आले. मात्र तरीही कोंडी आटोक्यात येत नसल्याने पोलिसांनी नवी शक्कल लढवली. टॅक्सी किं वा अन्य कोणत्याही वाहनाने बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या प्रवशांना ठरावीक ठिकाणीच वाहनातून उतरण्याची मुभा देण्यात आली, तर वाहनात बसण्यासाठी अन्य जागा निश्चित करून देण्यात आल्या. खासगी वाहने आणि टॅक्सींसाठीच्या जागा भिन्न असल्याचे वाहतूक पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. प्रत्येक ठिकाणी मनुष्यबळ तैनात करून प्रवाशांना उतरविण्यासाठी किंवा बसविण्यासाठी वाहने के वळ ३० सेकंदच तेथे थांबतील याची काळजी घेण्यात आली.

रस्ता ओलांडण्यासाठी उपाययोजना

या गजबजलेल्या भागात पादचारी किंवा ग्राहक कोठूनही रस्ता ओलांडतात. त्यामुळेही वाहनांचा वेग मंदावतो, अपघात संभवतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी क्र ॉफर्ड मार्केटजवळील लोकमान्य टिळक मार्ग, माता रमाबाई आंबेडकर मार्ग, डी. एन. मार्ग आदी प्रमुख रस्त्यांवर चार ते पाच ठिकाणांवरूनच ग्राहक रस्ता ओलांडू शकतील, अशी उपाययोजना के ल्याचा दावाही पोलिसांनी के ला.