News Flash

‘स्मार्ट सिटी’ शहरांच्या निवडीत राजकारण – चव्हाण

केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेकरिता शहरांची निवड करताना सत्ताधारी भाजपने राजकारण आणल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

| August 2, 2015 05:03 am

अशोक चव्हाण यांच्यावर कारवाईसाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज यापूर्वीही सीबीआयने तत्कालिन राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याकडे दिला होता. मात्र, त्यावेळी तो फेटाळण्यात आला होता.

केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेकरिता शहरांची निवड करताना सत्ताधारी भाजपने राजकारण आणल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मराठवाडय़ातील नांदेड किंवा लातूरचा यादीत समावेश का करण्यात आला नाही, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.
राज्यातील दहा शहरांची निवड करताना मराठवाडय़ातील फक्त औरंगाबादचा समावेश करण्यात आला. पण त्याच वेळी नांदेड, लातूर अथवा परभणी या शहरांचा विचार झाला नाही. कारण या महापालिकांमध्ये काँग्रेस वा राष्ट्रवादीची सत्ता असल्यानेच या महापालिकांना डावलण्यात आल्याचा आरोप खासदार चव्हाण यांनी केला आहे. लातूरमध्ये भाजपचा खासदार निवडून आला, पण या खासदाराचे प्रयत्न कमी पडलेले दिसतात. तसेच नांदेड आणि परभणीमधील भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना राज्याच्या सत्तेतील नेते किंमत देत नाहीत हेच स्पष्ट झाल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे. दहा शहरांची निवड करताना काँग्रेसची सत्ता असलेल्या सोलापूर शहराचा समावेश करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 5:03 am

Web Title: politics in smart city cities selection
टॅग : Smart City
Next Stories
1 आदिवासी आमदार धनगर आरक्षणाविरोधात
2 मंत्रिमंडळाच्या बैठकीस पंकजा मुंडे यांची सर्वाधिक दांडी
3 चिक्की प्रकरणाची चौकशी लांबण्याची शक्यता
Just Now!
X