‘लोकसत्ता’तर्फे प्रमुख नेत्यांशी ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ दूर-संवादमाला

विविध राजकीय पक्ष, त्यांचे नेते यांची ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ हे सर्वसामान्यांसाठी नेहमी कुतूहलाचे, कधी कौतुकाचे आणि प्रसंगी क्रोधाचेही कारण राहिलेले आहे. महाराष्ट्र राज्य आपल्या स्थापनेचा ६१वा वर्धापन दिन साजरा करीत असताना आगामी काळात या प्रमुख पक्षांचे येत्या दहा वर्षांतील राजकारण कसे असेल हे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘लोकसत्ता’ची ही ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ ही दूर-संवादमाला. आगामी राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात अशा सहा पक्षांचे प्रमुख नेते या उपक्रमातील वेबसंवादात आपले विचार मांडतील.

Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
Amol Kolhe, mic, Bhosari Constituency,
Video : …अन अमोल कोल्हे यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून माईक का खेचला? राजकीय सभ्यतेचे दिले उदाहरण
Udayanraje Bhosale, sharad pawar
“माझ्या बारशाचं जेवण…”, शरद पवारांच्या कॉलर उडवण्याच्या कृतीवर उदयनराजेंची प्रतिक्रिया
amar kale wardha marathi news, ramdas tadas marathi news
वर्ध्यात राष्ट्रवादीच्याच दोघांमध्ये लढत ?

देशातील सर्वात प्रगतीशील म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याची भविष्यातील वाटचाल कशी असेल, याबाबत नेहमीच उत्सुकता असते. करोनामुळे गेली दोन वर्षे राज्याला कठोर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अन्य राज्यांची स्पर्धा असली तरी विदेशी गुंतवणुकीपासून औद्योगिक, सेवा क्षेत्र, वित्तीय क्षेत्र, स्थावर मालमत्ता यात महाराष्ट्र  नेहमीच आघाडीवर राहिले.

या पार्श्वभूमीवर पुढील दहा वर्षांत महाराष्ट्राची वाटचाल कोणत्या मार्गाने होईल, त्या वाटचालीतील राजकीय आव्हाने, आर्थिक व सामाजिक परिस्थिती याचा आढावा या नेतेमंडळींकडून घेतला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्याच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या वर्षी झालेल्या ‘साठीचा गझल… महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद कार्यक्रमात शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांनी राज्याने कशी प्रगती केली याचा आढावा घेतला होता. ‘दृष्टी आणि कोन’ या वेबसंवादातून भविष्याचा वेध घेतला जाणार आहे.

सहा दिवसांत… पुढील आठवड्यात ३१ मेपासून ५ जूनपर्यंत दररोज सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या वेबसंवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे हे भूमिका मांडणार आहेत. समारोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवादाने होईल.

-: वेळापत्रक :-

३१ मे: राष्ट्रवादीच्या  खासदार सुप्रिया सुळे

१ जून: मनसेचे प्रमुख राज ठाकरे

२ जून:  वंचित बहुजन आघाडीचे  अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

३ जून: काँग्रेसतर्फे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

४ जून: माजी मुख्यमंत्री, भाजपचे देवेंद्र फडणवीस

५ जून: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रायोजक

प्रस्तुती :  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

सहप्रायोजक : एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), कपॅसिटे इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि. ऑनलाइन सहभागासाठी…

दूर-संवाद मालेत सहभागी होण्यासाठी http://tiny.cc/ LS_Drushti_ ani_Kon  येथे नोंदणी आवश्यक.

क्यूआर कोडद्वारेही सहभागी होता येईल.