मुंबई : उत्तर भारत हा जगातील सर्वाधिक प्रदूषित प्रदेश असून याचा परिणाम म्हणून दिल्ली व कोलकाता येथील नागरिकांचे आयुर्मान ९ वर्षांनी घटेल, असा निष्कर्ष शिकागो विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी के लेल्या आंतरराष्ट्रीय अभ्यासातून समोर आला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. २००० सालच्या प्रारंभाच्या तुलनेत या दोन्ही राज्यांमधील नागरिकांना २.५ ते २.९ वर्षांचे अधिकचे आयुर्मान गमवावे लागते आहे.

प्रदूषणाचा नागरिकांच्या आयुष्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन अभ्यासकांनी ‘हवा गुणवत्ता आयुर्मान निर्देशांक’ तयार केला आहे. यानुसार भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ यांचा समावेश असणारा दक्षिण आशिया हा सर्वाधिक प्रदूषित प्रदेश आहे. अतिप्रदूषित अशा उत्तर भारतातील दिल्ली आणि कोलकाता या महानगरांमध्ये २०१९ सालातील स्थिती कायम राहिल्यास येथील नागरिकांच्या आयुर्मानात ९ वर्षांनी घट होईल, असे अभ्यासकांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

भारतातील वायू प्रदूषणाची उच्चतम पातळी काळानुसार भौगोलिकदृष्ट्या विस्तारत असून ही धोक्याची घंटा आहे. दोन दशकांपूर्वीचा विचार के ला असता घातक सूक्ष्मकणांमुळे होणारे प्रदूषण हे के वळ वाळवंटाचे वैशिष्ट्य राहिलेले नाही. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. २००० सालाच्या सुरुवातीला नागरिकांचे जे आयुर्मान होते त्या तुलनेत या दोन्ही राज्यांमधील नागरिकांना २.५ ते २.९ वर्षांचे अधिकचे आयुर्मान गमवावे लागत असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

जगात इतरत्र कु ठेही आढळणार नाही असा प्रदूषणाचा दहापट निकृष्ट स्तर उत्तर भारतातील ४८ कोटी नागरिक अनुभवत आहेत; मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार प्रदूषणाची पातळी घटल्यास नागरिकांचे आयुष्य ५ किं वा त्यापेक्षाही अधिक कालावधीसाठी वाढू शकते.

वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम दक्षिण आशियात केंद्रित झाले आहेत; मात्र या भागातील प्रशासनाला समस्येच्या तीव्रतेची जाणीव असून त्या पद्धतीने कृतीही के ली जात आहे, ही चांगली गोष्ट आहे. – केन ली, संचालक, हवा   गुणवत्ता आयुर्मान निर्देशांक