पॉर्न रॅकेट प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्रा आणि रायन थोर्पे  यांचा जामीन अर्ज मुंबईच्या कोर्टाने फेटाळला आहे. यापूर्वी मंगळवारी कोर्टाने राज कुंद्रा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तर मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्रांचा सात दिवसांचा पोलीस रिमांड मागितला होता. मात्र, कोर्टाने तिसऱ्यांदा रिमांड मंजूर करण्यास नकार दिला.

राज कुंद्रा यांचा अश्लील चित्रपटांच्या निर्मितीमध्ये सक्रिय सहभाग घेत होता, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. मुंबई क्राइम ब्रँचनेही राज कुंद्रा यांच्या विरोधात ठोक इलेक्ट्रॉनिक पुरावे असल्याचा दावा केला आहे. पॉर्न फिल्मच्या बदल्यात व्यवहार केल्याचे पुरावे मुंबई पोलिसांनाही मिळाले आहेत. त्याचबरोबर, अंमलबजावणी संचालनालय देखील या प्रकरणात सक्रिय झाले आहे. मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांनी पॉर्न फिल्मच्या निर्मितीपासून आणि त्यांच्या ऑनलाइन रिलीजमधून गेल्या वर्षी ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान किमान १.२५ कोटी रुपये कमावले.

“मला अश्लील चित्रपटात काम करण्यास भाग पाडले”; गहना वशिष्ठसह ४ जणांविरोधात तक्रार दाखल

पॉर्न फिल्म प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये मढ येथील एका बंगल्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली होती. त्यानंतर राज कुंद्र यांनी तातडीने आपल्याकडी सर्व डेटा डिलीट केला होता आणि तसेच त्यांनी आपला मोबाइल फोनही बदलला होता, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

राज कुंद्रामुळे बॉलीवूडवर आली गदा; सोशल मीडियावर ‘हा’ हॅश टॅग झाला ट्रेंड

२० जुलैला राज कुंद्राला अटक झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणी राज कुंद्र आणि शिल्पा शेट्टीच्या बँका खात्यांची देखील मुंबई गुन्हे शाखेने चौकशी केली असता खळबळजनक माहिती समोर आली आहे. राज कुंद्राच्या बँक खात्यांमधून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार होत असल्याचं उघड झालंय. तर राज कुंद्राची कानपूरमधील दोन बँक खाती सील करण्यात आली आहेत.